मनोरंजन

अनुष्का शर्माचा अतिशहाणपणा, पोलिसांनी ठोठावला 10,500 चा जुर्माना !

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. अनुष्का शर्मा सध्या तिच्या बाईक राईडमुळे प्रचंड चर्चेत आली. मात्र, तिची हीच बाईक राईड आता तिला महागात पडली आहे. नुकताच अनुष्काने शूटसाठी वेळेवर पोहचता यावे म्हणून बाईकचा पर्याय निवडला. मात्र, यादरम्यान तिने अशी चूक केली की, ती टीकेची धनी ठरली.
यावेळी अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डने बाईक चालवली, तर अभिनेत्री त्याच्या मागे बसली होती. पण, यावेळी दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. यानंतर ती सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाली. काही नेटकऱ्यांनी तिच्यावर तुफान टीका केली. अनेकांनी तिचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोलिसांना टॅग करून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर विना हेल्मेट दुचाकी प्रवास करणाऱ्या अनुष्काला 10,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांना टॅग करत एका चाहत्याने आपली प्रतिक्रिया दिली होती. मुंबई पोलिसांना टॅग करताना या युजरने लिहिले होते की, ‘बाईकस्वार आणि मागील दुचाकीस्वार दोघांचेही हेल्मेट गायब आहे. @MumbaiPolice कृपया लक्ष द्या’. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ‘आम्ही हे वाहतूक पोलिसांशी शेअर केले आहे’, असे म्हटले होते. त्यानंतर आता अनुष्काला दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे विना हेल्मेट स्वॅग दाखवणारी ही बाईक राईड अनुष्काला चांगलीच महागात पडली आहे.
टीम लय भारी

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

7 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

7 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

7 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

8 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

13 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

15 hours ago