रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडेची आगामी सिनेमा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चर्चेत आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डानी तब्ब्ल 30 किलो वजन कमी केले आहे. हा चित्रपट दोन दिवसांत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाबद्दल एक महत्वाची बातमी समोर येतेय. (Swatantryaveer Savarkar movie Sachin Pilgaonkar will play the role of Netaji Subhash Chandra Bose) नुकतेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या टीमने एक पोस्टर शेअर केलं आहे. या मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत सचिन पिळगावकर दिसतं आहे.
एल्विश यादवच्या अटकेवर ईशा मालवीयचं मोठं विधान, हात जोडून म्हणाली- ‘मी सध्या…’
या पोस्टर मध्ये सचिनला ओळखू शकणे कठीण आहे. सचिन यांच्या अभिनयाची झलक ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसून आली. पण सचिन यांना कोणीच ओळखू शकलं नाही. (Swatantryaveer Savarkar movie Sachin Pilgaonkar will play the role of Netaji Subhash Chandra Bose)
या सिनेमात रणदीप हूडा, अंकीता लोखंडे, अमित सियाल हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात अभिनेत्याने अभिनय आणि दिग्दर्शनही केले आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट आहे. ते क्रांतिकारक, समाजसुधारक आणि राजकारणी होते. ज्याचे पात्र रणदीप हुड्डा या चित्रपटात साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये चित्रपटामध्ये प्रदर्शित होणार आहे.
NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखी सावंतच्या विरोधात ठोकला 11 लाखांचा मानहानीचा दावा
View this post on Instagram
यादरम्यान रणदीप हुड्डा ने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा लूक लोकांना आश्चर्यचकित करत आहे. या फोटोत रणदीपला ओळखणे कठीण होत आहे. त्याचे हे रूपांतर पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचा हा फोटो शेअर करताना रणदीप हुड्डा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ब्लॅक वॉटर.’ काला पानीच्या शिक्षेदरम्यान सावरकर अत्यंत बारीक झाले होते, हे रणदीपच्या या चित्रावरून दिसते. तशाच प्रकारे रणदीपनेही स्वत:चा कायापालट केला आहे.
‘मुस्लिम ४ लग्न करू शकतात म्हणून ‘ते’ लोक जळतात का?’ UCC वर जावेद अख्तरचं खोचक विधान
या फोटो मध्ये रणदीप खूप बारीक दिसत आहे. त्याच्या शरीराची हाडे दिसत आहेत. ही काही पहिलीच वेळ नाही, याआधी रणदीपने सरबजीतसाठी असेच बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता.
वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी त्याने केलेले परिवर्तन रसिकांना खूप भावत आहे. रणदीपने हे पात्र साकारले नसून ते जगले आहे, हे ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. रणदीपने प्रत्येक दृश्यात सावरकरांची झलक उत्तम प्रकारे दाखवली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.