31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमनोरंजन‘घरत गणपती’ चित्रपटाची या दिवशी होणार रिलीज

‘घरत गणपती’ चित्रपटाची या दिवशी होणार रिलीज

‘घरत गणपती’ हा भव्य चित्रपट 26 जुलैला आपल्या भेटीला, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे.अतिशय सुंदर कथाविषय, त्याला अभिनयसंपन्न कलाकारांची जोड यातून एक उत्तम कलाकृती दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर आपल्यासमोर घेऊन येत आहेत. त्याआधी ‘घरत गणपती’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक आपल्यासमोर आली आहे. ‘कुटुंब’ हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो.

‘घरत गणपती’(Gharat Ganapati) हा भव्य चित्रपट 26 जुलैला (26 july) आपल्या भेटीला, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे.अतिशय सुंदर कथाविषय, त्याला अभिनयसंपन्न कलाकारांची जोड यातून एक उत्तम कलाकृती दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर आपल्यासमोर घेऊन येत आहेत. त्याआधी ‘घरत गणपती’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक आपल्यासमोर आली आहे. ‘कुटुंब’ हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो.(‘Gharat Ganapati’ to release on this day)

नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’ च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट ‘घरत गणपती’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर,दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी