महाविकास आघाडीकडून शरद पवार (sharad pawar ) यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवत माढा लोकसभा मतदारसंघ जानकर (mahadev jankar ) यांना देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, पवारांच्या मनातला डाव उलटला. महादेव जानकर यांनी महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं आता माढ्यात पवार कुणाला संधी देणार असा सवाल उपस्थित होत आहे. (Sharad Pawar will announce a new candidate after Mahadev Jankar Madha Lok Sabha)
गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यात उमेदवारीचा तिढा कायम आहे. भाजपनं (BJP) रणजितसिंह नाईक निंबाळकरांना (Ranjitsinh Naik Nimbalkar) उमेदवारी जाहिर केल्याने राजकीय नाट्य सुरु झालं आहे. तर दुसरीकडं मविआ (maha vikas aghadi) कोणाला मैदानात उतरवणार? याबाबत अजून निर्णय झालेला नाही.
मात्र, एका पत्रकार परिषदमध्ये पवार यांनी वैयक्तिक मत मांडलं होतं. माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे आणखी लोक येतील, महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील, असं शरद पवार म्हणाले होते.
महादेवरावांनी पवारांच्या मनातलं जाणलंच नाही; अजित पवार घेणार फायदा?
मात्र, जानकर यांनी पवारांना पाठ फिरवली. आता माढ्यासाठी शरद पवार मोहिते पाटलांना मैदानात उतरवतील अशी चर्चा रंगली आहे. भाजपकडून तिकीट बदलाचे कोणतेही संकेत न मिळाल्याने मोहिते पाटील पुन्हा शरद पवार गटातून उभारणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण ती आता खरी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहिते पाटील यांच्यात 2019 मध्ये लोकसभा उमेदवारीमुळे मतभेद झाल्याने मोहिते पाटील हे भाजपच्या गळाला लागले होते. मात्र यावेळी मोहिते पाटील यांना भाजपनं डावल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळं आता शरद पवार या संधीचा फायदा घेणार असल्याचे बोलले जात आहे.
माढ्याच्या जागेसाठी शरद पवारांच्या मनातील उमेदवार कोण?
शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे ऋणानुबंध कमी झालेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवार थेट मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे शरद पवार यांचे जुने संबंध आगामी लोकसभा निवडणुकीत कामी येणार असे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे. त्यामुळं पवारांना जानकर महायुतीसोबत गेले तरी अधिक फरक पडणार नाही असं म्हणायला हरकत नाही.
विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्याही मनात तुतारी आहे. तुम्ही शांत राहिलात तर तुमचे नेतृत्व तालुक्यापुरते मर्यादित ठेवतील. त्यामुळे भाजप सोडा तुतारी हाती घ्या, अशा घोषणाच्या मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी एका बैठकीमध्ये दिल्या होत्या.