35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनकंगनाला घरातूनच मिळाले राजकीय बाळकडू; पणजोबांनी काँग्रेसकडून जिंकली होती निवडणूक

कंगनाला घरातूनच मिळाले राजकीय बाळकडू; पणजोबांनी काँग्रेसकडून जिंकली होती निवडणूक

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) निवडणूकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. अखेर काल भाजपनं यावर शिक्कामोर्तब केला. भाजपनं काल उमेदवारांची पाचवी यादी जाहिर करत कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरवलं. दरम्यान, कंगना तिचे पणजोबा स्व. सरजू सिंह रणौत यांच्या पावलावर पाऊल ठेवंल का? मंडी मतदारसंघातून कंगना सहज निवडणून येईल का? असं सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.(Kangana Ranaut great grandfather Sarju Singh Ranaut contested election from Congress bjp)

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) निवडणूकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. अखेर काल भाजपनं यावर शिक्कामोर्तब केला. भाजपनं काल उमेदवारांची पाचवी यादी जाहिर करत कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरवलं. दरम्यान, कंगना तिचे पणजोबा स्व. सरजू सिंह रणौत यांच्या पावलावर पाऊल ठेवंल का? मंडी मतदारसंघातून कंगना सहज निवडणून येईल का? असं सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.(Kangana Ranaut great grandfather Sarju Singh Ranaut contested election from Congress bjp)

कंगना पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. 2021 मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची बरीच चर्चा होती. मात्र त्यावेळी भाजपने कारगिल हिरो कुशल ठाकूर यांना उमेदवार केले होते.

कंगना पणजोबा स्व. सरजू सिंह रणौत यांच्या पावलावर पाऊल ठेवंल का?

भाजपने कंगना रणौतला मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर अभिनेत्रीच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे. कंगनाचे वडील आणि आजोबा कोणत्याही प्रकारे राजकारणात सक्रिय नव्हते, पण तिचे पणजोबा स्व. सरजू सिंह रणौत विधानसभेचे सदस्य होते. रणौत यांच्या तीन पिढ्यांनंतर त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी राजकारणात उतरले आहे.
कंगनाचे पणजोबा सरजू सिंह राणौत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विधानसभेत पोहोचले होते. मात्र, कंगना भाजपकडून राजकारणाच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळं मंडी मतदारसंघातून कंगना सहज निवडणून येईल का? असं सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

फडणवीसांचा अधिक विचार नाही पण आम्ही…; बच्चू कडूंचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्यांदाच मंडी लोकसभा जागेसाठीच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही महिला उमेदवार उभा केला आहे.

कंगनाचे पंजोबा आमदार कधी होते?

देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1952 साली झाल्या. हिमाचल प्रदेशची ही पहिली विधानसभा निवडणूक होती. त्या वेळी सध्याचे कांगडा, कुल्लू, हमीरपूर, उना, लाहौल स्पीती इत्यादी जिल्हे राज्याचा भाग नव्हते.

त्या काळात राज्यात 36 जागांवर निवडणूक झाली आणि यशवंतसिंह परमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 35 जागांवर निवडणूक लढवली आणि 24 वर विजय नोंदवला. 8 जागांवर अपक्ष विजयी झाले. तर 3 जागा किसान मजदूर प्रजा पक्षाच्या वाट्याला गेल्या. त्यावेळी रेवळसर, भांबळा आणि महादेव या मंडईतील विधानसभा जागा होत्या.

त्या वेळी मंडीमध्ये सरजू सिंह हे काँग्रेसच्या वतीने भांबला मतदारसंघातून निवडून आले होते. सरजू सिंह हे कंगना राणौतचे पंजोबा होते. 1 नोव्हेंबर 1956 रोजी हिमाचल प्रदेशला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले आणि ही पहिली विधानसभा राष्ट्रपती राजवटीत विसर्जित करण्यात आली.

गेल्या वर्षीपासून कंगनाची निवडणूक लढवण्याची चर्चा

कंगना रणौतने काही महिन्यांपूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यामुळे ती लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चितच झाले होते.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कंगनाचे वडील अमरदीप रणौत यांनी मीडियाला एक निवेदन देऊन आपली मुलगी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. हिमाचल व्यतिरिक्त कंगना गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि चंदीगडमधूनही निवडणूक लढवणार होती.

कंगना रणौत ही मूळची मंडी जिल्ह्यातील सरकाघाट उपविभागातील भांबला येथील रहिवासी आहे. कंगनाचा जन्म 3 मार्च 1987 रोजी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर कंगनाने दिल्लीतून शिक्षण घेतले. 2006 मध्ये गँगस्टर या पहिल्या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वडील अमरदीप राणौत यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, तर आई आशा रणौत या शिक्षिका आहेत. कंगनाच्या मोठ्या बहिणीचे नाव रंगोली चंदेल आहे.

लोकसभा तिकीट मिळाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया

“माझा प्रिय भारत देश आणि भारतीय जनतेचा स्वत:चा पक्ष भारतीय जनता पार्टी ज्याचं मी नेहमीच समर्थन केलं. आज भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझी जन्मभूमी मंडी हिमाचल प्रदेश मतदारसंघातून लोकभा उमेदवार म्हणून जाहीर केलं. मी या ठिकाणाहून लोकसभा लढवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाचं स्वागत करते. आज मी अधिकृतरित्या पक्षात सहभागी झाले आहे याचा मला अभिमान वाटतो आणि आनंदही होतो. मी एक योग्य कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक असेन. धन्यवाद.” अशा आशयाची इंस्टा स्टोरी कंगनाने शेअर केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी