29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमनोरंजनमराठी चित्रपटाची कथा पोहचली थेट बॉलीवूडमध्ये, 'छोरी' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी चित्रपटाची कथा पोहचली थेट बॉलीवूडमध्ये, ‘छोरी’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

टीम लय भारी

मुंबई : ‘छोरी’ बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर अमेझॉन ओरिजिनल या ओटीटी प्लटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. भारतासोबतच हा चित्रपट २४० देश- प्रदेशांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी अमेझॉनवर प्रदर्शित होणार आहे (‘Chhori’ Bollywood’s movie trailer is released).

भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हिस आणि शिखा शर्मा यांनी एकत्र येऊन ‘छोरी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुसरत भरुचा, मिता विशिष्ट, राजेश जैस, यानिया भारद्वाज आणि सौरभ गोयल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Dance Deewane : वर्णभेदाच्या व्हिडीओवर राघव जुयाल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, राघवने दिले याबाबत स्पष्टीकरण

‘ही माती नाही, शेण आहे,’ म्हणत सोनू सूदच्या फोटोवर नेटकऱ्यांची मजेशीर टिपणी

चित्रपटाविषयी सांगताना अभिनेत्री नुसरत भरुचा म्हणते की, भय उत्पन्न करणाऱ्या हा चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवेल. भयपटासारख्या या चित्रपटात काम करताना उत्साहवर्धक वाटले. तसेच हा ट्रेलर म्हणजे, एका प्रचंड मोठ्या रहस्याची केवळ एक झलक आहे. आम्ही चित्रपटासाठी घेतलेले कष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचतील, अशी मला आशा आहे. असे ही नुसरत म्हणाली.

राजकुमार आणि पत्रलेखा यांचा लग्नातला फोटो वायरल,दोघांच्या लूकची सोशल मीडिया वर जोरदार चर्चा

Nushrratt Bharuccha to play a pregnant lady in Chhori

काय आहे चित्रपटाची कथा?

शहरातील एका कटुंबातून एक तरुण जोडपे घराबाहेर काढले जाते. हे तरुण जोडपे एका उसाच्या शेतात असलेल्या घरात आसरा घेतात. त्यावेळी चित्रपटातील नायिका आठ महिन्यांची गरोदर गृहिणी असते. तिच्या बाळाच्या पाठीमागे लागलेल्या पिशाच्च शक्तींपासून सरंक्षण करण्यासाठी ती निकराचे प्रयत्न करत असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी