मनोरंजन

Kapil Sharma : लोकांना खळखळून हसवणारा ‘कप‍िल शर्माचा शो’ पुन्हा येत आहे

लोकांना खळखळून हसवणारा ‘कप‍िल शर्माचा शो’ पुन्हा टीव्हीवर येत आहे. या शोमध्ये कोण कोण असेल, याची उत्सुकता सर्वांनाचा लागली आहे. टेलीव्हिजनवरचा लोकप्रिय शो म्हणजे कपिल शर्माचा (Kapil Sharma) ‘कॉमिडी नाईट विथ कप‍िल शर्मा’. हा शो अनेक दिवसांपासून बंद होता. तो पुन्हा सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचे चाहते या ‘शो’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता कप‍िल शर्मा नेमका कोणता शो घेऊन येणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असताना अर्चना पुरन सिंहने इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये प्रोमोची एक झलक दाखवली आहे. या शोमध्ये कॉमेडियन असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.

अर्चना पूरन सिंहने म्हटले आहे की, कप‍िल शर्मा शो नविन रोमांचक आणि नव्या आवतारामध्ये दिसणार आहे. अर्चनाने दिलेल्या क्लूमुळे चाहते खुश झाले आहेत. या नवीन सीजनमध्ये कॉमेडियन भारती सिंह द‍िसणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण तिला छोटं बाळ आहे. त्यामुळे कदाचित ही चर्चा सुरु आहे.

अर्चना पूरन सिंह म्हणते की, प्रोमो शूटसाठी तिला एक लाईन दिली आहे. ती तिच्या लक्षात राहत नाही, असे ती मजेने सांगते. कपिल आणि त्याची टीम कॅनडामध्ये आहे. त्याच्या टीममध्ये कृष्णा अभिषेक, काकू शारदा, चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती हे आहेत. साधारणपणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयानंतर या शोला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या ‘शो’ मध्ये अर्चना पूरन सिंह देखील असणार आहे. शिवाय आणखी 4 नवे कलाकार देखील आहेत.

हे सुद्धा वाचा

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा ‘ऐक’ नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !

Security of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी रशियात सापडला

Chhagan Bhujbal :छगन भुजबळ यांनी डासांवरुन तानाजी सावंत यांना चांगलेच कोंडीत पकडले

‘ द कप‍िल शर्मा शो’द्वारे टेलिव्हिजनवर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर, विनोदी भागासाठी त्याचा नवीन लूक टाकला आहे आणि लिहले आहे. ‘नवीन सीझन, नवीन रुप #tkss#comingsoon’ या सीझनमध्ये अर्चना पाहूणी जज असणार आहे. नवीन सीझन हा कोणत्या तारखेला सुरु होईल याची माहिती मात्र अजून मिळालेली नाही.

रूपाली केळस्कर

Recent Posts

नाशिक जळगाव जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण (baby abducted) झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण…

16 hours ago

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

16 hours ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

17 hours ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

17 hours ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

18 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

18 hours ago