30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईदुधाच्या भाववाढीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मंत्रालयासमोर आंदोलन

दुधाच्या भाववाढीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मंत्रालयासमोर आंदोलन

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या माहामारीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशातच शेतकऱ्यांच्या समोर दुसरे संकट आले ते म्हणजे दुधाचे दर कमी केले. दुधाचे दर कमी झाल्यामुळे रयत क्रांती संघटना आक्रमक झाले आहेत. रयत क्रांती संघटनेने दुध दर वाढीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करत आहेत. दुधाच्या भाववाढीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले (Former Minister of State for Agriculture Sadabhau Khot staged an agitation in front of the Ministry for raising the price of milk).

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) तसेच दुध उत्पादक शेतकरी व कार्यकर्त्यांसह मंत्रालयासमोर दूध दरवाढीसाठी आज आंदोलन केले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गाईच्या दुधाला १८ ते २० रुपये पर्यंत प्रति लिटर भाव मिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार ३/५ फॅट व ८/5 एसएनएफ नुसार किमान २५ रुपये प्रति लिटर दर देणे आवश्यक आहे, परंतु या आदेशाला सहकारी आणि खासगी दुध संस्थाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दुध संस्था आणि खाजगी कंपन्यांवर कोणतीही कारवाई करण्याचे काम दुग्ध विकास विभागाकडून होत नाही. इतकेच नाही तर खाजगी दुध संस्थावर आणि खाजगी कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल : शरद पवार

वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर

What local news reports tell us about Covid-19 mortality in rural areas of North and Central India

ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत FRP आहे. त्याच धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी. महाराष्ट्रातील दुध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे. ऊसासाठी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ७०/३० चा फ्लॅर्मुला आहे त्याप्रमाणे दुध उत्पादकांसाठी किमान ८५/१५ चा फ्लॅर्मुला करणे गरजेचे आहे. सध्या कोल्हापूर मधील गोकुळ दूध संघामध्ये ८१/१९ चा फॉर्मुलाकार्यरत आहे. १९६६-६७ नंतर संकरीकरणाचा तंत्रज्ञान युक्त वापर दिसत नाही. गिर, धारपारकर हे आमचे गाई ब्रीड जागतिक आदर्शवत आहेत या जातींच्या गाईचे संगोपन होणे गरजेचे आहे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दुध उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दुध उत्पादकांना भाव मिळणे गरजेचे आहे.

या सर्व मागणीसाठी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मंत्रालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांची मंत्रालयामध्ये भेट घेण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे सचिवांनी कबुल केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी