आरोग्य

आता घरीबसल्या बनवा नैसर्गिक ब्लश, तुमची त्वचा राहणार निरोगी

आजकाल सर्वांना सुंदर दिसण्याची इच्छा असते. त्यासाठी ते बाजारात मिळणारे अनेक रासायनिक उत्पादनापासून तयार करण्यात आलेल्या क्रिम किव्हा पावडरचा वापर करतात. या रासायनिक उत्पादनामुळे लोक थोड्या वेळासाठी तर सुंदर दिसतात. मात्र, नंतर त्यांच्या त्वचेवर याचा परिणाम दिसणं सुरु होऊन जाते. अनेक वेळा लोकांना केमिकल उत्पादनांची ॲलर्जी होते आणि त्यांचा चेहराही खराब होतो. (Beauty tips Now make natural blush at home, your skin will be healthy) सुंदर दिसण्यासाठी तुम्हीही रोज मेकअप केलात तर ते तुमची त्वचा खराब करू शकते. जर तुम्हाला मेकअपशिवाय गुलाबी गाल हवे असतील तर तुम्हाला यासाठी घरगुती उपायांचा वापर करावा लागेल. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या तुमच्या गालाला नैसर्गिक गुलाबी ब्लश देऊ शकता. (Beauty tips Now make natural blush at home, your skin will be healthy)

जाणून घ्या, कडक उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

घरी नैसर्गिक ब्लश कसा बनवायचा

बीटरूट खाल्ल्याने आरोग्य सुधारते आणि चेहऱ्यावर लावल्याने रंगही सुधारतो. जुन्या काळी, जेव्हा मेक-अप उत्पादने नव्हती, तेव्हा गाल गुलाबी करण्यासाठी बीटरूटचा वापर केला जात होता. बीटरूटपासून ब्लश बनवण्यासाठी तुम्हाला उकडलेल्या बीटरूटचा जाड लगदा लागेल. या लगद्यामध्ये ग्लिसरीनचे काही थेंब घाला आणि तुमचा नैसर्गिक ब्लश तयार होईल. तुम्ही ते एका लहान डब्यात साठवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला गुलाबी गाल हवे असतील तेव्हा ते ब्लश म्हणून वापरू शकता. (Beauty tips Now make natural blush at home, your skin will be healthy)

शिळी चपाती खाण्याचे फायदे वाचाल, तर फेकण्याआधी नक्की विचार कराल

गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी नैसर्गिक ब्लशही तयार करता येतो. जर तुम्हाला ताज्या गुलाबाच्या फुलांपासून ब्लश बनवायची असेल तर खलबत्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून पेस्ट बनवा आणि त्यात आवश्यकतेनुसार ॲरोरूट पावडर घाला आणि दोन्ही चांगले मिसळा. एका छोट्या काचेच्या डब्यात भरा, ताज्या गुलाबापासून बनवलेला ब्लश ओला होईल. जर तुम्हाला ब्लश पावडर स्वरूपात हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करावा लागेल. यासाठी खलबत्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि ॲरोरूट पावडर एकत्र करून चांगले बारीक करा. पावडर तयार झाल्यावर एका छोट्या काचेच्या डब्यात ठेवा, तुम्ही ब्रशच्या मदतीने हे ब्लश लावू शकता. (Beauty tips Now make natural blush at home, your skin will be healthy)

जर तुम्हाला तुमच्या गालावर हलका गुलाबी रंग हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला केशरी रंगाचे गाजर लागेल. हे गाजर किसून, कोरडे करा आणि नंतर मिक्सरमध्ये ॲरोरूट मिसळून बारीक करा. गाजरापासून बनवलेला तुमचा नैसर्गिक ब्लश तयार आहे.

माठातील पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

जास्वंदच्या फुलांपासून घरच्या घरी ब्लश देखील सहज बनवता येतो. यासाठी तुम्हाला जास्वंदची फुले ॲरोरूट पावडरने बारीक करून घ्यावी लागतील, सुगंधासाठी तुम्ही त्यात तुमच्या आवडीचे तेल घालू शकता. तयार झाल्यावर काचेच्या छोट्या डब्यात भरा. घरी बनवलेले नैसर्गिक ब्लश रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा, जेणेकरून ते बर्याच काळासाठी वापरता येईल.

काजल चोपडे

Recent Posts

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

21 mins ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

2 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

3 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

3 hours ago

सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची (deported) कारवाई केली जाते. मात्र…

3 hours ago

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

6 hours ago