38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यमाठातील पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

माठातील पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

मातीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषकतत्त्वे मिळतात. पूर्वजांपासून मातीचे महत्त्व सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मातीचा
घरगुती वापरात कसा उपयोग करावा याचेही ज्ञान त्यांना होते. म्हणूनच त्यांनी मातीची भांडी < Earthen pots >, मडकी, माठ बनवायला सुरवात केली.
आजही ही परंपरा बऱ्याच ठिकाणी जपली जात आहे. मात्र आपणास हे माहित नसेल की, मातीची भांडी का वापरली जायायची?
त्याचे फायदे काय आहेत?
काय आहेत फायदे?

घशासाठी उपयुक्त
ज्यांना सर्दी, खोकला आणि अस्थमाचा त्रास असतो, त्यांना फ्रिजमधील थंड पाणी वर्ज्य केले जाते. अशावेळी माठातील थंडगार पाणी
तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले.(For cold water, people prefer earthen pots, while the benefits of drinking water in pots are many. )

नैसर्गिक थंडावा मिळतो
मातीच्या माठाला लहान लहान छिद्र असतात, त्यामुळे त्याच्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. अशावेळी तुमची
तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. शिवाय फ्रिजमधील अतिथंड पाण्याच्या सेवनाने
अनेक व्याधी निर्माण होतात. यासाठी माठातले पाणी स्वस्त, पर्यावरण पूरक आणि आरोग्यदायी आहे.

मातीतले उपयुक्त घटक
ज्या मातीचा माठ बनविण्यासाठी उपयोग होतो त्या मातीत भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि इलेक्ट्रो मॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे
मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे घटक पाण्यात मिसळतात, परिणामी त्या पाण्याने आपल्या शरीराला फायदाच होतो.

मेटॅबॉलिझम सुधारण्यात मदत
मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.

माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन
शरीरातील अ‍ॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जर तुमचं शरीराच्या आतील वातावरण अ‍ॅसिडिक
असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या
माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते.

केमिकल्स रहीत
बऱ्याच प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ‘बीपीए’ नावाचे हानिकारक केमिकल असते, ज्याचा परिणाम आरोग्यावर विपरित होतो. म्हणून
मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी
बनते. तसंच पाणी दूषित होत नाही.

उष्माघातापासून संरक्षण
उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी उपयुक्त ठरते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी