35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यजाणून घ्या, कडक उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

जाणून घ्या, कडक उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

रणरणत्या उन्हांत शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण शहाळ्याचे पाणी, फळांचे रस, ताक(buttermilk ), सरबतं अशा अनेक शीतपेयांचा आपल्या आहारात समावेश करतो. आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही पेय नियमीत आहारात असावीत असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. कारण प्राचीन काळापासून जेवणासोबत दही अथवा ताक वाढण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात ताकाला अमृतपेय असं म्हटलं आहे. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं.(buttermilk benefits in summer)

तर जाणून घेवुयात ताक पिण्याचे फायदे

शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो

ताक हे थंड पेय असल्यामुळे ते प्यायल्यामुळे शरीराला त्वरीत थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. एक ग्लास ताकात जिरे पावडर, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ मिसळून प्यायल्यामुळे तुमची तहान लगेच भागते. शिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते. तुम्ही ताकात एखादा बर्फाचा तुकडा टाकू शकता.

मात्र बर्फ न टाकताही ताक पिण्यामुळे तुमच्या शरीराला त्वरीत थंडावा मिळू शकतो. बाजारातील कोल्ड ड्रिंकपेक्षा हे नैसर्गिक पेय नियमित पिणे शरीरासाठी नक्कीच लाभदाययक ठरू शकते. ज्या महिलांना मॅनोपॉजच्या काळात अंगातून दाह जाणवतो. त्यांनी नियमित ताप पिल्यास त्यांना नक्कीच आराम मिळू शकतो. सकाळी ताक पिण्याचे फायदे चांगले होत असल्यामुळे रात्रीपेक्षा सकाळी ताक पिणे फायदेशीर ठरते.

पचनशक्ती सुधारते

ताक पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. कारण यामध्ये दह्यातील शरीरासाठी उत्तम असे बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळतो आणि तुमची पचनशक्ती वाढते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते. कारण ताकामुळे तुमच्या आतड्यांचे कार्य सुरळीत होते. अपचन आणि पोटाच्या समस्या असलेल्या लोकांना ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताकामुळे तुम्हाला अन्नातून झालेले पोटाचे इनफेक्शन अथवा फूड पॉईझनिंगचा त्रास होत नाही.

अॅसिडिटी कमी होते

बऱ्याचदा बाहेरचे अपथ्यकारक पदार्थ खाण्यामुळे अथवा अती प्रमाणात तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात. मात्र यावर सोपा उपाय हा की एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि धणे पावडर मिसळून पिणे. कारण ताकातील लॅक्टिक अॅसिड तुमच्या पोटातील अॅसिडिटी कमी करते आणि धणे पावडर आणि ताकाचा थंडावा छातीत होणारी जळजळ कमी करते.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते

शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे ह्रदयावर ताण येऊन ह्रदयविकार होतात. मात्र जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे ह्रदयविकारांचा धोका टाळता येतो. निरोगी ह्रदयासाठी नियमित एक ग्लास ताक पिणे फायदेशीर ठरेल.

त्वचेसाठी उत्तम

ताक नियमित पिण्याची सवय फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठीही चांगली आहे. कारण ताक पिण्यामिुळे तुमची पचनशक्ती सुधारते. ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स यामुळे बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे ताकामधील लॅक्टिक अॅसिड तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी