31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी पिण्याचे फायदे

पुदिन्यामध्ये असलेले जीवनसत्त्व ए, जीवनसत्त्व सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, थायमिन, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आपल्या शरीराला अनेक फायदे देण्याचे काम करतात. कोणत्याही स्वरूपात याचे नियमित सेवन केल्याने उष्णता आणि उष्णतेपासून आपले रक्षण होते. त्यामुळे त्याचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.पुदिन्याच्या थंड गुणधर्मअसलेल्या पाण्यामुळे उन्हाळ्यात मोशन सिकनेस आणि मळमळीची समस्या कमी होते. .पुदिन्यामध्ये मेन्थॉल आणि रोसमरिनिक सारखे अँटी-ऑक्सिडेंट असतात.

पुदिन्यामध्ये असलेले जीवनसत्त्व ए, जीवनसत्त्व सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, थायमिन, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आपल्या शरीराला अनेक फायदे देण्याचे काम करतात. कोणत्याही स्वरूपात याचे नियमित सेवन केल्याने उष्णता आणि उष्णतेपासून आपले रक्षण होते. त्यामुळे पुदिन्याचे पाणी पिणे (drinking mint water) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.पुदिन्याच्या थंड गुणधर्मअसलेल्या पाण्यामुळे उन्हाळ्यात मोशन सिकनेस आणि मळमळीची समस्या कमी होते. .पुदिन्यामध्ये मेन्थॉल आणि रोसमरिनिक सारखे अँटी-ऑक्सिडेंट असतात. (Benefits of drinking mint water in summer)

त्यामुळे पुदिना आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी पिणे किंवा कुठल्याही स्वरुपात पुदिन्याचे सेवन करणे चांगले असते.

उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी पिण्याचे फायदे

पचनसंस्था-उन्हाळ्यात अनेकदा लोकांना पोटाशी संबंधित समस्या जाणवू लागतात. अशावेळी तुम्ही पुदिन्याची पाने वापरू शकता. पेपरमिंट पाचन समस्यांवर एक नैसर्गिक उपचार असू शकतो. यात अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे अपचन दूर करण्यास उपयुक्त असतात. तुम्ही पुदिन्याचे पाणी पिऊ शकता यामुळे पोटाची अस्वस्थता दूर होण्यास मदत होते.

पिंपल्सपासून मुक्ती-पुदीनामध्ये ॲन्टी इंफ्लेमेटरी आणि ॲन्टी बॅक्टेरियल गुण असतात, जे पिंपल्सची फाइट करण्यात मदत करतात. तसेच त्वचेवर होणारे डाग, खाज यापासून देखील संरक्षण करतात.

पोट ठेवते स्वस्थ- पुदिन्यात असलेले मेन्थॉल पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे पोट निरोगी राहण्यास मदत होते.

तोडांची दुर्गंधी दूर करते- पुदिन्यात असलेले मेन्थॉल थंडपणा आणते. त्याचे ॲन्टी- बॅक्टेरियल गुण तोडांतील बॅक्टेरिया मारण्यास मदत करून श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.

उलट्यांपासून आराम- उलट्या थांबवण्यासाठी पुदिन्याचे सेवन फायदेशीर ठरते. यासाठी पुदिन्याच्या पाण्यात दोन थेंब मध मिसळून प्या.

सर्दी- खोकला पासून आराम- पुदिन्याच्या रसात काळी मिरी आणि काळे मीठ चहाप्रमाणे उकळून ते पिल्याने सर्दी, खोकला, ताप यामध्ये आराम मिळतो.

डोकेदुखी कमी करणे- पुदिन्याच्या पानांमध्ये डोकेदुखी कमी करणारे गुणधर्म असतात. अनेकदा उन्हाळ्यात लोक डोकेदुखीला बळी पडतात. कडक उन्हात बाहेर पडल्यामुळे डोक्यात भयंकर वेदना जाणवतात. अशा तऱ्हेने ताजेपणाने भरलेली ही पुदिन्याची पाने तुम्ही वापरू शकता. याची सुगंधित पाने आपल्याला डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही पुदिना तेल किंवा पुदिन्याच्या बामने डोक्याला मसाज करू शकता.

लठ्ठपणा- जर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार झाला असाल तर पुदिन्याची पाने तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतात. पुदिन्याची पाने वजन कमी करण्यास उपयुक्त असतात. यासाठी तुम्ही पुदिन्याची पानं पिऊ शकता. हवं तर लिंबाचा रस आणि काळी मिरी पावडर घालू शकता. यामुळे तुमचे पेय अधिक चविष्ट होईल. हे पेय दररोज रिकाम्या पोटी प्यावे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी