33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअर्ज भरण्याच्या गर्दीने सर्वसामान्यांना त्रास,भर उन्हात वाहनांच्या रांगा आणि पोलिसांना ताप

अर्ज भरण्याच्या गर्दीने सर्वसामान्यांना त्रास,भर उन्हात वाहनांच्या रांगा आणि पोलिसांना ताप

सोमवारी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारांनी हजारो समर्थकांचे उपस्थितीत रॅली काढल्याने शहरात ठिकाणी भर उन्हात वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी झाली सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.सोमवारी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी हजारो भक्तांचे उपस्थितीत गौरी पटांगण पंचवटी येथून भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला.त्यामुळे रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल तर थेट त्रंबक नाकापर्यंत रस्ते काही काळ बंद करण्यात आले होते.

सोमवारी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज (rush to fill the forms) दाखल केले. शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारांनी हजारो समर्थकांचे उपस्थितीत रॅली काढल्याने शहरात ठिकाणी भर उन्हात वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी झाली सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.सोमवारी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी हजारो भक्तांचे उपस्थितीत गौरी पटांगण पंचवटी येथून भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला.त्यामुळे रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल तर थेट त्रंबक नाकापर्यंत रस्ते काही काळ बंद करण्यात आले होते.(The rush to fill the forms has troubled the common man, the queues of vehicles in the hot sun and the fever of the police)

त्यामुळे पर्यायी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला.सकाळी आठ वाजल्यापासून महंत शांतिगिरी महाराजांचे हजारो भक्त गौरी पटांगण येथे दाखल होत होते.त्यामुळे मालेगाव स्टँड,पंचवटी कारंजा आधी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. महंत शांतिगिरी महाराज यांची रॅली सुरू झाल्यानंतर पुन्हा रविवार कारंजा ते सीबीएस पर्यंत वाहतुकीचा फज्जा उडाला होता.महंत शांतिगिरी महाराज यांची रॅली सुरू झाल्यानंतर पुन्हा रविवार कारंजा ते सीबीएस पर्यंत वाहतुकीचा फज्जा उडाला होता.

महंत शांतिगिरी महाराजांची रॅली संपल्यानंतर काही वेळातच शालिमार येथील शिवसेना कर्यालालयापासून मेन रोड मार्गे धुमाळ पॉइंट,महात्मा गांधी रोड .मेहेर सिग्नल अशी महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ उमेदवार भास्कर भगरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली काढण्यात आली.त्यामुळे शालिमार पासून तर रेस्क्रोस सिग्नल पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.महंत शंतिगिरी यांचा अर्ज भरल्यानंतर त्र्यंबक नाका ते मेहेर सिग्नल रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.मात्र महविकास आघाडीची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आल्यानंतर पुन्हा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला त्यामुळे पुन्हा काही काळ नागरिकांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागला.महंत शंतिगिरी यांचा अर्ज भरल्यानंतर त्र्यंबक नाका ते मेहेर सिग्नल रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.मात्र महविकास आघाडीची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आल्यानंतर पुन्हा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला त्यामुळे पुन्हा काही काळ नागरिकांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागला.

कोण आले आहे ?
शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनाच्या रांगा लागल्या असताना अनेक वाहनधारक एकमेकांना कोण आले आहे कशामुळे रस्ते बंद आहेत अशी विचारणा करीत होते तर अनेक ठिकाणी वाहनधारक रस्ते बंद केल्यामुळे नाराजी व्यक्त करीत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी