आरोग्य

हार-तुऱ्यांऐवजी तुम्ही मला जनतेची आरोग्यदायी भेट दिली; एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंताचे केले जाहीर कौतुक !

राज्यातील प्रत्येक कुटुंब आरोग्य संपन्न असले पाहिजे हे शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis government) प्रमुख धोरण असून त्या दृष्टीने मंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आरोग्य खात्यामार्फत राज्यभरात विविध आरोग्य अभियानांचे आयोजन करत नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी (दि.९) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यभरात महाआरोग्य शिबिर, महारक्तदान शिबिरांचे आयोजन करत लाखो नागरिकांची, मुलांची मोफत आरोग्य तपासणी केली. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘आज दिवसभरात हार-तुऱ्यांऐवजी तुम्ही मला जनतेची आरोग्यदायी भेट दिली’ असे म्हणत शिंदे यांनी मंत्री सावंत यांचे जाहीर कौतुक केले.(Eknath Shinde praised Tanaji Sawant; Health check-up camps across the state on Chief Minister Eknath Shinde  birthday)

आज एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात आरोग्य खात्यामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. मता सुरक्षित घर सुरक्षित अभियान आज पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आजपासून ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ हे मुलांच्या आरोग्यासाठी अभियान आजपासून सुरु करण्यात आले असून त्यानंतर राज्यातील सर्व पुरुषांची देखील आरोग्य तपासणी पुर्ण करण्यात येणार असून येत्या जुलै अखेर राज्यातील १२.५० कोटी जनतेचे हेल्थ कार्ड काढण्यात येणार आहे.

‘माता सुरक्षित घर सुरक्षित अभियाना’व्दारेमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील ४.५० कोटी महिलांची आरोग्य तपासणी पूर्ण केली. कुटुंबाचे रहाटगाडगे चालविण्यात महिला रात्रंदिवस झटत असतात. अशावेळी त्या आपल्या आरोग्याकडे देखील कानाडोळा करतात, ही बाब लक्षात घेऊन मातांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी आरोग्य खात्यामार्फत ‘माता सुरक्षित घर सुरक्षित’ हे अभियान राबविले.

पंतप्रधानांनी केले संसदेत कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बुधवारी संसदेत भाषण करताना माता सुरक्षित घर सुरक्षित अभियानाचा उल्लेख केला. कुटुंब सुरक्षित ठेवायचे असल्यास कुटुंबातील महिला आरोग्य संपन्न असली पाहिजे हा या अभियानाचा उद्देश असुन पंतप्रधानांनी अभियानाचे कौतुक केले.

रक्त संकलनाचा विक्रम, दिवसभरात ७५०० पिशव्या जमा
त्याचप्रमाणे राज्यात आज दिवसभरात जवळपास १८०० ठिकाणी महाआरोग्य शिबिरे घेण्यात आली. तसेच महारक्तदान शिबिरांचे देखील मोठ्याप्रमाणात आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरांव्दारे राज्यात आज एका दिवसात ७५०० रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. एका दिवसामध्ये इतक्या मोठ्याप्रमाणात रक्ताच्या हजारो पिशव्या संकलित होण्याचा हा एक विक्रमच आरोग्य खात्याने केला आहे.

एका दिवसात तीन लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य खात्याने आज शुन्य ते १८ वयोगटातील मुला-मुलींची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्याचे अभियान आजपासून सुरु केले. आज या अभियानाच्या पहिल्याच दिवशी दिवशी राज्यात तीन लाखांहून अधिक मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हे राज्यातील सर्व शाळांमध्ये पुढील दोन महिन्यांमध्ये करण्यात येणार आहे.

आरोग्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल राहील
घर सुरक्षित माता सुरक्षित अभियानांतर्गत आठरावर्षांवरील महिलांची तपासणी पूर्ण झाली. त्यानंतर आता शुन्य ते १८ वर्षापर्यंतच्या मुला-मुलींची आरोग्य तपासणी दोन महिन्यांत पुर्ण होणार आहे. ‘माता सुरक्षित घर सुरक्षित’ हे महिलांच्या आरोग्याबाबतचे घोषवाक्य होते. आता मुलांसाठी ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ या घोषवाक्याखाली मुलांच्या आरोग्य तपासणीचे अभियान पुढील दोन महिन्यांत राबविण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांचे सरकार काँग्रसेने पाडले; राज्यसभेत मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

नाना पटोले यांनी घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता, शिवसेनेने आघाडीधर्म पाळावा: लोंढे

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शिंदे-फडणवीस यांच्या चंद्रकांत पाटील यांना तातडीने बैठकीच्या सूचना

जुलै अखेर राज्यातील १२.५० कोटी जनतेचे हेल्थ कार्ड काढणार
पुढच्या टप्प्यामध्ये पुरुषांची आरोग्य तपासणी होणार आहे. या सगळ्याचा आढावा घेतल्यास राज्यातील १२.५० कोटी जनतेचे जुलैपर्यंत हेल्थ कार्ड तयार होईल. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य ठरणार आहे की, आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रकर्षाने काम करणारे सर्वात पुढे आहे. या सगळ्या ज्या योजना आहेत त्या दहा कलमी कार्यक्रमाअंतर्गत टप्प्या टप्याने राबविण्याचा संकल्प आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

1 hour ago

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

17 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

17 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

18 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

18 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

20 hours ago