28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनाना पटोले यांनी घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता, शिवसेनेने आघाडीधर्म पाळावा: लोंढे

नाना पटोले यांनी घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता, शिवसेनेने आघाडीधर्म पाळावा: लोंढे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून (daily Saamana) केलेली टीका अयोग्य आहे. राजीनाम्याचा निर्णय पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता, तर काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा (MVA) धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने (Shiv Sena) मान राखायला हवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी स्पष्ट केले आहे. (Atul Londhe’s response to the criticism of Nana Patole from daily Saamana)

काँग्रेस पक्षाने काय निर्णय घ्यावेत हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. काँग्रेसचा निर्णय चुकीचा ठरला असा आरोप करून मित्रपक्षाच्या निर्णयावर आक्षेप घेणे व त्यावर अशी जाहीरपणे टीका करणे आघाडीच्या धर्माला अनुसरुन नाही, असेही लोंढे म्हणाले.

काँग्रेस पक्षात एक निर्णय प्रक्रिया आहे त्यानुसारच निर्णय घेतले जातात. पक्षाध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की पक्षातील सर्वजण त्याचा मान राखतात व त्यानुसार त्याची अंमलबजावणीही केली जाते. सोनियाजी गांधी यांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून पक्षहितासाठी घेतलेला तो निर्णय होता. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकटाची मालिका सुरु झाली या आरोपात काहीही अर्थ नाही, असे देखील अतूल लोंढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा 

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शिंदे-फडणवीस यांच्या चंद्रकांत पाटील यांना तातडीने बैठकीच्या सूचना

अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पुजाऱ्यावर गुन्हा दाखल!

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; गैरवर्तन केल्यास पाच परीक्षांसाठी निलंबन

लोंढे म्हणाले, जर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी कायम असते तर पुढचा प्रसंग टळला असता, या ‘जर-तर’ ला राजकारणात काहीच अर्थच नसतो. नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळेच मविआ सरकार अडचणीत आले असे म्हणणेही योग्य नाही, त्याला इतरही काही कारणे असू शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी