आरोग्य

हिवाळ्यात केसगळतीचा त्रास होतोय? मग हे उपाय कराच!

हिवाळ्यात केस गळण्याचे प्रमाण हे इतर ऋतू पेक्षा नेहमी जास्त असते. केसगळतीच्या समस्येवर वेळीच काळजी न घेतल्यास ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. जर तुमचे केस ही गळत असतील आणि तुम्ही काही घरगुती उपाय शोधत असाल तर या टिप्स तुम्हाला नक्की मदत करू शकतात. हे घरगुती उपाय काय आहेत आणि ते कसे वापरायचे ते जाणून घ्या…..

केसांना तेलाने मसाज करा

केसांना तेलाने मसाज करणे खूप महत्वाचे आहे. केसांना आणि टाळूला तेलाने व्यवस्थित मसाज केल्याने केसांच्या मुळांमध्ये रक्ताचा प्रवाह वाढतो. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात, आणि यांमुळे केस गळणे हळूहळू कमी होऊ लागते.

आवळा देखील गुणकारी आहे

आरोग्यासोबतच केस गळतीच्या समस्या रोखण्यासाठी आवळा खूप गुणकारी आहे. हे केवळ केसांच्या वाढीस प्रोत्साहन देत नाही तर केस मजबूत देखील करते. यासाठी आवळा पावडरमध्ये शिककाई आणि रेठा घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या. यानंतर केस पाण्याने धुवा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

मेथी दाणा सुद्धा प्रभावी

केसगळती नियंत्रित करण्यासाठीही मेथी गुणकारी आहे. मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात. यासाठी रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी मेथी दाणे बारीक करून घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि खोबरेल तेल घाला. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. ते कोरडे होईपर्यंत केसांवर ठेवा. यानंतर पाण्याने धुवा. काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल.

हे सुद्धा वाचा

PHOTO: हिवाळ्यासाठी तुप आहे सुपरफूड; हे आहेत आश्चर्यकारक फायदे

Winter Healthy Drinks: हिवाळ्यात सर्दीने केलंय त्रस्त; हे 7 प्रकारचे ज्यूस वाढवतात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती

PHOTO: हिवाळ्यात ‘या’ जीवघेण्या आजारांपासून सावध रहा!

कोरफड देखील काम करते

कोरफड जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच ते केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. यासाठी कोरफडीची पाने मधोमध कापून त्याचा गीर काढा आणि केसांच्या मुळांना लावून मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. केसगळतीपासून काही दिवसांत आराम मिळेल.

कांद्याचा रस ठेवतो केसगळतीवर नियंत्रित

केसगळती नियंत्रित करण्यासाठी कांद्याचा रस देखील प्रभावी आहे. यासाठी फक्त कांदा बारीक करून त्याचा रस काढा. ते केसांच्या मुळांना लावून मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल.

 

 

Roshani Vartak

Recent Posts

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

11 mins ago

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

6 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

7 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

7 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

8 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

8 hours ago