36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यPHOTO: हिवाळ्यात 'या' जीवघेण्या आजारांपासून सावध रहा!

PHOTO: हिवाळ्यात ‘या’ जीवघेण्या आजारांपासून सावध रहा!

हिवाळ्यात होणारे काही जीवघेणे आजार जे माणसांच्या जीवावर ही बेतु शकतात.

इतर कोणत्याही ऋतूपेक्षा हिवाळा हा ऋतू अनेकांसाठी आवडता असतो. परंतु हिवाळ्यात अनेक आजार सुद्धा हमखास होतात. काहींची तर जुनी दुखणी हिवाळ्यात डोके वर काढतात. शरीरातील उष्णता कमी झाल्यामुळे आणि वातावरणातील गारव्यामुळे हिवाळा काहीजणांना त्रासदायक वाटतो. याच हिवाळ्यात आणखी कोणते जीवघेणे आजार माणसांना होऊ शकतात हे आपण पाहूया…

PHOTO: हिवाळ्यात 'या' जीवघेण्या आजारांपासून सावध रहा!अस्थमा : हिवाळ्यात हवेचे तापमान कमी होते आणि त्यात वाढत्या प्रदूषणामुळे अस्थमाचा आजार असणाऱ्या व्यक्तींना याचा त्रास व्हायला लागतो. त्यांच्या श्वासनलिका आकुंचन पावतात आणि कफाचे प्रमाण वाढते त्यामुळे दम लागण्याचे प्रमाण सुद्धा वाढते, त्यामुळे अस्थमा रुग्णांसाठी हिवाळा घातक ठरू शकतो.

PHOTO: हिवाळ्यात 'या' जीवघेण्या आजारांपासून सावध रहा!न्युमोनिया : हवेचे कमी झालेले तापमान आणि प्रदूषणामुळे श्वसनमार्गाची प्रतिकार शक्ती कमी होते आणि जंतुसंसर्ग झपाटय़ाने होतात. फुफ्फुसांना सूज येवून त्यामध्ये कफ जमा होतो. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागतो, खोकला येतो, ताप सुद्धा येऊ लागतो त्यामुळे रुग्णाची प्रकृतीही खराब होते.

heart attackहार्ट फेलिअर : हिवाळ्यात शरीराचे तापमान बदलल्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी, हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे हृदयावर जास्त दाब दबाव येतो ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल स्तर वाढतो. आणि कमजोर हृदय असलेल्या व्यक्तीला हार्ट फेलिअरचा धोका वाटतो.

हे सुद्धा वाचा

Measles Outbreak in Mumbai : मुलांचे आरोग्य जपा; मुंबईत गोवरचा उद्रेक

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत

Deepika Padukoneone : दीपिका पदुकोणने तिचा सेल्फ केअर ब्रँड ’82 ईस्ट’ केला लाँच

PHOTO: हिवाळ्यात 'या' जीवघेण्या आजारांपासून सावध रहा!

श्वसनविकारः हिवाळ्यात थंडी आणि प्रदूषणामुळे पेशंटच्या साधा खोकल्याचे रूपांतर गंभीर खोकल्यामध्ये होते. शरीरात ऑक्सिजन घेण्याची फुफ्फुसाची क्षमता वेगाने कमी होते आणि त्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशींना मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. आणि त्यातून अंगदुखी, अस्वस्थपणा, थकवा वाढतो, शरीराची कार्यक्षमता कमी होते.

PHOTO: हिवाळ्यात 'या' जीवघेण्या आजारांपासून सावध रहा!डोळ्यांचे रोग: डोळे, श्वसनसंस्था आणि त्वचा या अवयवांचा हवेच्या प्रदूषणाशी थेट संबंध येत असल्यामुळे, थंडीती मधील बदलते वातावरण आणि प्रदूषण यांचा शरीरावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन डोळ्यांचे आजार होतात.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी