31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeआरोग्यनाशिक मनपातर्फे पोलिओ डोस मोहीम

नाशिक मनपातर्फे पोलिओ डोस मोहीम

रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी संपूर्ण भारतभर पोलिओ डोस मोहीम राबवण्यात आली. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सर्व रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे अंतर्गत विविध भागांमध्ये पोलिओ बुथ तयार करून ५ वर्षाच्या आतील बाळांना लस देण्यात आली. या मोहिमेचे पोलिओ बुथचे प्राथमिक उद्घाटन सातपूर येथील रुग्णालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांचे शुभहस्ते पार पडला. यावेळेस सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य सहाय्यक संचालक डॉ. गोविंद चौधरी व मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे व डॉ. अजिता साळुंखे, सातपूर विभागीय नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कोशिरे व सातपूर रुग्णालयाच्या डॉ. रुचिता पावसकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी संपूर्ण भारतभर पोलिओ डोस मोहीम राबवण्यात आली. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सर्व रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे अंतर्गत विविध भागांमध्ये पोलिओ बुथ तयार करून ५ वर्षाच्या आतील बाळांना लस देण्यात आली. या मोहिमेचे पोलिओ बुथचे प्राथमिक उद्घाटन सातपूर येथील रुग्णालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांचे शुभहस्ते पार पडला. यावेळेस सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य सहाय्यक संचालक डॉ. गोविंद चौधरी व मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे व डॉ. अजिता साळुंखे, सातपूर विभागीय नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कोशिरे व सातपूर रुग्णालयाच्या डॉ. रुचिता पावसकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळेस उपस्थित सर्व बालकांतर्फे पोलिओचा संदेश असलेले फुगे अवकाशामध्ये सोडण्यात आले. जेणेकरून सार्वजनिक आरोग्य विभागाची कामकाजाची उंची सुद्धा अशाच प्रकारे भव्य रहावी असे आवाहन डॉ अशोक करंजकर यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी