29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeएज्युकेशननाशिकमधील के के वाघच्या ८ विद्यार्थ्यांना दुबईतील कंपनीत इंटर्नशिपची संधी

नाशिकमधील के के वाघच्या ८ विद्यार्थ्यांना दुबईतील कंपनीत इंटर्नशिपची संधी

शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असणाऱ्या के के वाघ शिक्षण संस्था, नाशिक संचलित के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांना दुबई येथील एलाइड कॉन्ट्रैक्टिंग व फाईव्ह होल्डिंग्स या दोन नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप संधी मिळालेली आहे. यांत कॉम्पुटर सायन्स अँड डिझाइन विभागाचे ४, मेकॅनिकल १, आयटी १ आणि सिव्हिल विभागाचे २ अशा एकूण ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना याचे मानधन देखील मिळणार आहे. या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असणाऱ्या के के वाघ शिक्षण संस्था, नाशिक संचलित
के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांना दुबई येथील एलाइड कॉन्ट्रैक्टिंग व फाईव्ह होल्डिंग्स या दोन नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप संधी मिळालेली आहे. यांत कॉम्पुटर सायन्स अँड डिझाइन विभागाचे ४, मेकॅनिकल १, आयटी १ आणि सिव्हिल विभागाचे २ अशा एकूण ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना याचे मानधन देखील मिळणार आहे. या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. परदेशी (फाॅरेन) इंटर्नशिप ही संकल्पना के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाने राबवत, मुलांना करियरच्या अनुषंगाने नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दिल्याबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला.

विद्यार्थ्यांना इंटर्नशीप दरम्यान येणारे अनुभव त्यांच्या भावी वाटचालीस नक्कीच उपयोगी ठरू शकतात. तसेच के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाला २०२२ मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न स्वायत्त दर्जा मिळाला आहे. त्या अंतर्गत अनेक नावीन्य पूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये ६ महिन्यांची उन्हाळी किंवा हिवाळी इंटर्नशिपचा समावेश असेल, अशी माहिती प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर यांनी दिली.

संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ, विश्वस्त मंडळ, सचिव प्रा. के. एस. बंदी, प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर, संगणक विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एस. साने, आय. टी विभाग प्रमुख डॉ. पी. डी. भामरे व ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. पी. के शहाबादकर यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी