आरोग्य

बटाटा खाल्याने वजन वाढत नाही; ‘ही’ सोपी पद्धत करून पाहा

बटाटा हा असा पदार्थ आहे, जो अगदी कोणत्याही रेसिपीमध्ये चांगला फिट होतो. चिकन असो वा भाजी… रस्सा असो वा चाट सगळ्यात बटाट्याचे अगदी अनन्यसाधारण असे महत्व आहे. पण बटाटा म्हणजे पिष्टमय पदार्थ आणि असे पदार्थ वजन वाढवतात असे आपल्याला वाटते. त्यामुळे स्थूलपणाशी निगडीत एखादी उपमा द्यायची असेल तर लगेच आपण अरे काय बटाट्यासारखा झालायंस असे म्हणतो. इतकेच नाही तर एखादा व्यक्ती संथ असेल तरी देखील त्याला डोक्यात बटाटे भरलेत का? असे सांगून हिणवले जाते. चविष्ट असा बटाटा बाकी काही असू दे पण वजन वाढवतो अशा भितीने अनेक जण खात नाहीत. पण खरंच बटाटा वजन वाढवतो का? असा सवाल आहारप्रेमींना कायम सतावत आहे.

बटाटाच्या सेवनाने वजन वाढते असा एक समज आहे. खरे तर ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे लक्षात ठेवूनच आहाराकडे पाहायला हवे. आहारतज्ज्ञांच्या मते, बटाटा खाल्ल्याने वजन वाढतेच असे नाही. उलटपक्षी या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक असल्याने ते खाणेच हितावह ठरते. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटस् आणि स्टार्च मुबलक प्रमाणात असतात, हे खरं आहे. परंतु हेदेखील खरं आहे, की बटाट्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे व्हिटॅमिन सी आणि फायबर्सदेखील भरपूर प्रमाणात असतात. युनायटेड स्टेटस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरने दिलेल्या माहितीनुसार, बटाट्याच्या 100 ग्रॅम भागामध्ये दोन ग्रॅम फायबर आणि दोन ग्रॅमपर्यंत प्रोटिन असतात. इतकेच नाही तर हे कमी कॅलरीफूडदेखील आहे. प्रोटिनमुळे तो वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम अन्न पर्याय आहे.

आता तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही बटाट्याचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. योग्य वेळी बटाटा खाल्ला तर तो तुम्हाला उर्जा देण्याचे काम करेल आणि तुमचे वजनही वाढणार नाही.

  • सर्वजण आपल्या आहारामध्ये उकडलेल्या बटाट्यांचा समावेश करू शकता. उकडलेले बटाटे पूर्णतः थंड होऊ द्या. यानंतर हे बटाटे मॅश करा किंवा त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
  • या बटाट्यांचा स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही मसाल्याचा वापर करू शकता. तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये उकडलेले बटाटे, दही किंवा ताकाचे सेवन करू शकता.
  • अशा पद्धतीनं बटाटे खाल्ल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. दह्यातून उकडलेले बटाटे खाल्ल्यासही वजन घटते.

हे सुद्धा वाचा:

फक्त ४ गोष्टी करून वाढवा तुमची इम्युनिटी पावर

आता मधुमेहाला करा बाय-बाय! 

सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिल्याने होतात अनेक फायदे ! जाणून घ्या एका क्लिकवर

Potato, Fitness Tips, Benefits of Boiled Potato, Diet for Weight Loss, Fitness Tips Benefits of Boiled Potato Diet for Weight Loss

Team Lay Bhari

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

3 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

3 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

4 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

4 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

5 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

5 hours ago