33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमुंबईआता मधुमेहाला करा 'बाय-बाय'! टाईप-१ आजाराला अटकाव करणाऱ्या औषधास अमेरिकेच्या "एफडीए"ची मान्यता

आता मधुमेहाला करा ‘बाय-बाय’! टाईप-१ आजाराला अटकाव करणाऱ्या औषधास अमेरिकेच्या “एफडीए”ची मान्यता

विस्कळीत आणि व्यस्त जीवनशैलीमुळे मुंबईकरही या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. भारतात सुमारे ८.६ लाख लोकांना टाईप-१ मधुमेह या आजाराने ग्रासले आहे. या प्रकारचा मधुमेह किशोरावस्थेत होण्याची शक्यता अधिक असते.

जेवण आणि झोपण्याच्या अनियमित वेळेमुळे भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण आता या आजाराला अटकाव करणारे औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. ‘झील्ड’ (Tzield) असे या औषधाचे नाव असून अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन संस्थेने (US FOOD AND DRUG ADMINISRTATION) याला मान्यता दिली आहे. ‘प्रोव्हेन्शन बायो अँड सनोफी’ या औषध कंपनीने हे औषध तयार केले आहे. टाईप-१ मधुमेह या आजारास अटकाव करण्यास हे औषध मदत करते. आठपेक्षा अधिक वयोगटातील मधुमेहींना या औषधाच्या वापरास मान्यता देण्यात आली आहे. (Say goodbye to diabetes now! US FDA approves drug to prevent type 1 disease)

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यावर टाईप-१ मधुमेह हा आजार होतो. यामुळे स्वादुपिंडातील इन्शुलिनची निर्मिती करणाऱ्या ‘बीटा’ पेशी नष्ट होतात. ही प्रक्रिया लक्षणे दिसू लागल्यानंतर पहिले काही महिने सुरु रहाते. टाईप-१ मधुमेहावर आतापर्यंत कोणताच उपाय नव्हता. अमेरिकेत २०१९ पर्यंत १९ लाख लोक टाईप-१ मधुमेहापासून त्रस्त होते, अशी माहिती अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने दिली आहे. तर भारतात सुमारे ८.६ लाख लोकांना या आजाराने ग्रासले आहे. या प्रकारचा मधुमेह किशोरावस्थेत होण्याची शक्यता अधिक असते.

मुंबईतही मधुमेहाचे प्रमाण वाढत चालल्याचे महापालिकेने केलेल्या सर्व्हेत आढळून आले आहे. पाचपैकी एका मुंबईकराला मधुमेहाच्या आजाराने ग्रासले आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधत महापालिकेने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब उघडकीस आली होती. १८ ते ६९ या वयोगटातील सुमारे १८ टक्के मुंबईकरांच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढलेले आढळून आले. २४ प्रभांगांमध्ये हे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. यावेळी सहा हजार पेक्षा अधिक लोकांची मधुमेहाची तपासणी करण्यात आली होती. उपाशीपोटी त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा 

रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका लागू करा; माजी आरोग्य मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

हुकूमशहांच्या हातात देशाचे प्रजासत्ताक; या दडपशीलाच ‘लोकांचे राज्य’ म्हणायचे का? नरेंद्र मोदी उत्तर द्या!

महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाकडे पालकांची पाठ ; महापालिकेच्या ‘सीबीएससी’, ‘आयसीएससी’च्या ८६८ जागांसाठी चार हजारपेक्षा अधिक अर्ज

औषध कसे काम करते?
या आजारात (टाईप १ मधुमेह) स्वादुपिंडात तयार होणाऱ्या बिटा पेशी नष्ट होतात. या पेशी इन्शुलिनची निर्मिती करतात. हे इन्शुलिन रक्तातील साखरेला शरीरातील अन्य पेशींपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. त्याचा वापर शरीरात ऊर्जा तयार करण्यासाठी केला जातो. रोगप्रतिकारक शक्ती विकसित करणाऱ्या यंत्रणेवर ज्या वेळी हल्ला होतो आणि रक्तातील इन्शुलिन बनविणाऱ्या पेशी नष्ट होतात त्यावेळी मधुमेहाचा आजार जडतो. आपल्या शरीरात आजारांपासून लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार करणारी यंत्रणा कार्यान्वित असते. त्या यंत्रणेत हे औषध शिरकाव करते. ‘झील्ड’ हे औषध इन्शुलिनची निर्मिती करणाऱ्या पेशींना नष्ट करणाऱ्या इम्युन पेशींना निष्क्रय करते. तसेच या औषधामुळे आजारापासून लढण्यासाठी आवश्यक असलेल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पेशींची निर्मिती होते. या औषधाच्या सेवनाने टाईप-१ मधुमेहाला दोन वर्षांपासून अधिक काळ अटकाव करण्यास मदत होते. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने या औषधाच्या वापरासाठी मान्यता दिली आहे.

दररोज किमान सात हजार पावले चालण्याचा व्यायाम करा
मधुमेहासारखा आजार होऊ नये यासाठी चालण्याचा व्यायाम हा सर्वात चांगला असल्याचे मत या विषयातील तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे. लोकांनी दररोज किमान सात हजार पावले चालले पाहिजे. दिवसभरात सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. वेगात चलण्याचा व्यायाम केल्यामुळे चार वर्षे आयुष्य वाढण्यास मदत होईल, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी