29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeआरोग्यफक्त ४ गोष्टी करून वाढवा तुमची इम्युनिटी पावर

फक्त ४ गोष्टी करून वाढवा तुमची इम्युनिटी पावर

सतत बदलणाऱ्या ऋतुमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. यावेळी आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणे महत्वाचे आहे. कोणत्याही ऋतुमध्ये आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल आणि बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे असेल तर आपल्याला आपल्या दैनंदिन जिवनात काही बदल करणे आवश्यक आहे. तब्येत चांगली ठेवायची असेल तर पुरेशी झोप, व्यायाम, ताणरहित जीवन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताजा आणि समतोल आहार या गोष्टींची आवश्यकता असते.

हवामान बदलले, वातावरणात काही विषाणूंचा शिरकाव झाला की काही जण लगेच आजारी पडतात. पण काहींची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने हवा कितीही बदलली तरी त्यांची तब्येत खराब होत नाही. प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी भारतील योग अभ्यासक काही महत्त्वाच्या गोष्टींचा सल्ला देतात. आज आपण ते जाणून घेऊयात.

1. तुळशीचा काढा
विविध प्रकारचे इन्फेक्शन्स दूर होण्यासाठी तुळस हा अतिशय सोपा उपाय आहे. दररोज 4 ते 5 तुळशीची पाने (कृष्ण तुळस), 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा गूळ किंवा खडीसाखर किंवा मध आणि 1 चमचा हळद घ्यायची. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन हे सगळे त्यामध्ये घालायचे. चांगले एकत्र झाले की हे पाणी प्यायचे. इम्युनिटी वाढण्यासाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे. तुळशीचा काढा जो रोग प्रतिकारशक्ती वाढवेल! Ayurvedic Tulsi Kadha Recipe

2. शंखपुष्पी
एका बाऊलमध्ये शंखपुष्पीची पावडर घेऊन त्यामध्ये पाणी घालून हे पाणी झाकून ठेवा. अर्धा तासाने हे पाणी गाळून यात लिंबाचा रस घालून मग ते कोमट करुन प्या. हे पाणी शक्यतो झोपताना प्यायला हवे. आयुर्वेदाच्या दुकानात ही पावडर मिळते. या मध्ये फ्लॅवोनाईडस आणि अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणात असल्याने ताण कमी होण्यास याची चांगली मदत होते.Shankhpushpi Powder – RGM Herbals

3. प्राणायाम
हा विविध गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त उपाय असून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. भ्रामरी प्राणायम नियमित केल्यास नायट्रस ऑक्साईडची निर्मिती होण्यास मदत होते त्यामुळे ते नियमित करायला हवे. याबरोबरच अनुलोम-विलोम हाही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम प्राणायामाचा प्रकार आहे.Things About Anulom Vilom Pranayama That You Should Know.

4. डोकं शांत ठेवणे
आपले डोके शांत असणे अनेक गोष्टींसाठी आवश्यक असते. अनेकदा आपण सोशल मीडिया आणि न्यूज पाहून पॅनिक होतो. या गोष्टींचा अनेकदा आपल्याला ताणही येतो. पण असा ताण न घेता स्ट्रेस फ्री लाईफ जगता यायला हवे. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. सकारात्मक विचार करणे, शांत राहणे हे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते.18 Simple ways to relax – Clockwise Credit Union

हे सुद्धा वाचा:

आता मधुमेहाला करा बाय-बाय! 

सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिल्याने होतात अनेक फायदे ! जाणून घ्या एका क्लिकवर

रोगप्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी ‘खा’ आल्याचे खास चविष्ठ लोणचं

Boost your immunity by doing just 4 things, Health Care, Boost your immunity

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी