33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमंत्रालयIAS transfers : मुंबई महानगर क्षेत्रात दोन दिवसांत चार महापालिकांमध्ये नवे आयुक्त

IAS transfers : मुंबई महानगर क्षेत्रात दोन दिवसांत चार महापालिकांमध्ये नवे आयुक्त

टीम लय भारी

मुंबई :  मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ( MMR ) कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर MMR क्षेत्रातील चार महापालिकांमध्ये नव्या आयुक्तांच्या ( IAS transfers in four Municipal Corporation )  नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर व मीरा भाईंदर या चार महापालिकांमध्ये नवीन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ( New IAS appointed in Thane, New Mumbai, Ulhasnagar and Mira Bhayandar ).

अवघ्या दोन दिवसांत या चार ठिकाणी नव्या आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कोरोना’ संसर्ग मुंबई महानगर क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mahavikas Aghadi

हे सुद्धा वाचा

गांधी हत्या समर्थक पोंक्षेंचा राष्ट्रवादीशी संबंध नाही; जयंत पाटलांचा खुलासा   

शिवसेना भवनात कोरोनाची एन्ट्री, सेना भवन बंद!

Coronavirus च्या मुकाबल्यासाठी 11 आयएएस अधिकाऱ्यांची फौज

ठाणे महापालिकेत डॉ. विपीन शर्मा, नवी मुंबई महापालिकेत अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये राज दयानिधी, तर मीरा भायंदरमध्ये डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका आयुक्त हे वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसाठी आहे. परंतु तरूण आयएएस अधिकारी असलेल्या डॉ. विपीन शर्मा यांच्यासाठी हे पद निवड श्रेणीत अवनत करण्यात आले आहे हे विशेष.

ठाणे महापालिका आयुक्तपद हे प्रधान सचिव दर्जाच्या IAS अधिकाऱ्यासाठी आहे. डॉ. विपीन शर्मा हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्तपद अवनत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी