33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeराजकीयBreaking : अजित पवार संतापले, माझ्या संस्थांवर धाडी टाकता, पण बहिणीच्यां घरांवर...

Breaking : अजित पवार संतापले, माझ्या संस्थांवर धाडी टाकता, पण बहिणीच्यां घरांवर धाडी कशासाठी ?

टीम लय भारी

मुंबई :  भाजप खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करीत आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली तर मी समजू शकतो. परंतु माझ्या तिन्ही बहिणींच्या घरांवर आयकर विभागाने धाड टाकली असल्याचा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे (Income tax department raids on Ajit Pawar’s sisters).

माझ्या तिन्ही बहिणींची ३० – ३५ वर्षांपूर्वी लग्नं झाली आहेत. त्या कुठल्याही कंपनीशी संबंधित नाहीत. त्यांचा राजकारणांशी सुद्धा काहीही संबंध नाही. असे असताना केवळ त्या माझ्या रक्ताच्या नात्यातील आहेत म्हणून इन्कम टॅक्स विभाग त्यांच्या घरावर धाडी टाकत असेल तर भाजपचे राजकारण किती खालच्या पातळीवर चालले आहे याची प्रचिती येते.

Ajit Pawar : अजित पवारांची मोठी घोषणा ! पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार

Ajit Pawar : BMC मध्ये महाविकास एकत्र लढणार ? की…, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

पंडीत नेहरूंपासून अनेकजणांपासूनची विविध सरकारे केंद्रात आली. राज्यातही पुलोदचे सरकार होते. १९९५ मध्ये शिवसेना – भाजपचे सरकार होते. पण यापूर्वी कोणीही असे सूडाचे राजकारण केले नव्हते. महाराष्ट्राचे राजकारण हे सुसंस्कृत राजकारण आहे. यशवंतराव चव्हाणांनी या सुसंस्कृत राजकारणाची घडी बसविली आहे. पण भाजपने सुडाचे राजकारण सुरू केल्याची तोफ अजित पवार यांनी डागली.

देशाचा विकास व्हावा म्हणून जनतेने भाजपला मतदान केले. पण विकास राहीला बाजूला. केंद्रातील सरकार वेगळीच पाऊले टाकत असल्याचाही संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.

Ajit Pawar : जिल्हा नियोजन विकास निधीत कपात नाही 

Ajit Pawar to launch Digital Baramati Umbrella App today

केंद्रीय संस्था विविध लोकांच्या वर धाडी टाकत आहे. कारवाई करीत आहे. पण भाजपच्या नेत्यांवर अशी कारवाई का झालेली दिसत नाही. भाजपच्या नेत्याच्या साखर कारखाने, सहकारी संस्थांवर अशा धाडी का पडत नाहीत, असाही सवाल अजित पवार यांनी केला आहे.

Breaking : अजित पवार संतापले, माझ्या संस्थांवर धाडी टाकता, पण बहिणीच्यां घरांवर धाडी कशासाठी ?

प्रसारमाध्यमांवर सुद्धा केंद्र सरकार धाडी टाकते. मीडियावर सुद्धा केंद्राचा दबाव येत असल्याकडे अजितदादांनी लक्ष वेधले.

यापूर्वी शरद पवार यांनाही ईडीची नोटीस पाठविली होती. पण त्यावेळी मोठे रामायण घडले. केंद्राचा डाव जनतेच्या लक्षात आल्याची जुनी आठवण सुद्धा अजित पवार यांनी यावेळी काढली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी