32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयजिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात 'महाविकास आघाडी'च्या तिन्ही पक्षांची भाजपवर मात !

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात ‘महाविकास आघाडी’च्या तिन्ही पक्षांची भाजपवर मात !

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील जिल्हापरिषदेच्या पोटनिवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. जिल्हानिहाय कोणत्या पक्षाला किती मते मिळाली आहेत याची आकडेवारी समोर आली आहे. (election commenced in maharashtra declaired district wise result)

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्याल तिन्ही पक्षांची सरशी झालेली दिसून येते. मात्र स्वतंत्र पक्षनिहाय पाहिल्यास मात्र भाजप आघाडीवर आहे.

Breaking : अजित पवार संतापले, माझ्या संस्थांवर धाडी टाकता, पण बहिणीच्यां घरांवर धाडी कशासाठी ?

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले : जयंत पाटील

राज्यात भाजपचे एकूण २३ उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेनेचे १२ उमेदवार निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची संख्या १७ इतकी आहे, तर काँग्रेसला १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच इतर पक्षांनाही काही मते मिळाली आहेत.

जिल्हानिहाय बलाबल

वाशीम

वाशीम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ५ मते मिळाली आहेत तर काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडी यांचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना आणि जनविकास आघाडीला प्रत्येकी एक उमेदवारावर समाधान मानावे लागले आहे. तर एक उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आला आहे.

पालघर

पालघर जिल्ह्यात एकूण १४ उमेदवार निवडून आले आहेत तर भाजपला आणि शिवसेनेला प्रत्येकी पाच उमेदवारांना यश मिळाले आहे. राष्ट्रवादीच् चार उमेदवार निवडून आले आहेत तर काँग्रेसची एकही जागा येऊ शकलेली नाही. तर संपूर्ण पालघरमध्ये आपला दबदबा असणाऱ्या बहुजनविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.

धुळे

धुळ्यात निवडून आलेल्या १५ जागांपैकी भाजपला आठ तर शिवसेना आणि काँग्रेसला अनुक्रमे दोन आणि तीन उमेदवारांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. तर इतर पक्षांना काहीही जागा मिळालेल्या नाहीत.

नंदुरबार

नंदुरबारजिल्ह्यातून ११ उमेदवारांना यश मिळालेले आहे त्यापैकी भाजपच्या चार, सेनेच्या तीन तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचत्त अनुक्रमे एक आणि तीन जागा विजयी झालेल्या आहेत.

अकोला

अकोल्यात एकूण १४ उमेदवार निवडून आले आहेत त्यापैकी भाजप आणि सेनेचा एक एकच उमेदवार विजयी झालेला आहे. तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस पक्षालाही एकच जागा मिळालेली आहे. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे. वंचितच्या एकूण नउ उमेदवारांना विजय मिळाला आहे.

नागपूर

नागपुरात एकूण १६ उमेदवारांना विजय मिळाला आहे. त्यापैकी भाजपाला तीन तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन तर सेनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. परंतु इतर पक्षांतील चार उमेदवार निवडून आलेले आहेत.

ग्रामीण भारतात लवकरच ५ जी नेटवर्क येणार

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात 'महाविकास आघाडी'च्या तिन्ही पक्षांची भाजपवर मात !

ZP Election Results 2021: नागपूर ते नंदूरबार काँग्रेसची सरशी, पालघरमध्ये सेनेचा झेंडा; धुळ्यात कमळ, अकोल्यात वंचितला कौल, वाशिममध्ये घड्याळाची टिक-टिक.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी