30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनाचा कहर : औरंगाबादेत कोरोनाचा तिसरा बळी; १५ वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह !

कोरोनाचा कहर : औरंगाबादेत कोरोनाचा तिसरा बळी; १५ वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह !

लय भारी टीम

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६५ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा शनिवारी सकाळी ६.५० वाजता मृत्यू झाला. अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी माध्यमांना दिली. शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एका १५ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या २९ वर गेली आहे.

लॉकडाऊनचा काटेकोरपणे पालन होत असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. ही चिंतेची बाब आहे. बिस्मिल्ला कॉलनी येथील रहिवासी असलेल्या वृद्धा सुरुवातीला सेन्ट्रल नाका परिसरातील खाजगी रुग्णालयात भरती होत्या. त्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले होते. १३ एप्रिल ला घाटी रुग्णालयाचा मेडिसीन विभागात स्वतंत्र संशयित कोरोना रुग्णांसाठीच्या अलगिकरण कक्षात उपचार सुरू असताना त्यांचा स्वब घेण्यात आला होता. १६ एप्रिलला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना वार्डात हलवण्यात आले होते. त्यावेळी मधुमेह रक्तदाब व किडनीचा आजाराने ग्रासल्यामुळे तब्बेत गंभीर असल्याचे यावेळी डॉ अरविंद गायकवाड यांनी कळवले होते. कोरोना बाधित रुग्णाचा हा शहरातील तिसरा मृत्यू आहे. तर हे तिन्ही मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत.

शहरात मंगळवारी सायंकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर मुलगा १० एप्रिल रोजीच खाजगी रुग्णवाहिकेने मुंबईहून आई-वडिलांसह शहरात दाखल झाला होता. त्याची आई गरोदर असल्याने प्रसूतीसाठी ते औरंगाबादेत आले. मुंबईहुन आल्याने मनपाने तिघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. यात मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, तर त्याच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याच्या आईचाही स्वब घेण्यात आलेला होता. हा अहवाल काय येतो, याकडे दोन दिवसांपासून लक्ष लागले होते. अखेर हा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. आता १५ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी