29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रखुशखबर : कापूस खरेदीला २० एप्रिलनंतर होणार सुरुवात

खुशखबर : कापूस खरेदीला २० एप्रिलनंतर होणार सुरुवात

लय भारी टीम

मुंबई : कोरोनाच्या हाहाकारामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योगधंदे, व्यापारांना बसला आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. राज्यात २० एप्रिलनंतर सरकारकडून कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. (१७ एप्रिल) या संदर्भात बैठक झाली. दरम्यान, जरी खरेदी सुरु केली तरी सोशल डिस्टन्सिंग पाळूनच ही खरेदी-विक्री करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, खरेदी आणि विक्रीसाठी ऑनलाईन बुकींग, फोन बुकींगचा वापर केला जाणार आहे. बुकींग केल्यानंतर शेतकऱ्यांना केंद्रावर येण्याचा दिवस आणि वेळ सांगण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, कृषी संदर्भातील कोणत्याही कामांना आणि वाहतूकीला अडथळा न करण्याचे निर्देश सरकारने या आधीही दिले होते. त्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा महराष्ट्र विकास आघाडी सरकारने दिला आहे. शेतकरी आनंदीत झाले आहेत.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी