30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रcow shed : मुंबईतील दूरसंचार विभागाच्या दारात गायींचा गोठा

cow shed : मुंबईतील दूरसंचार विभागाच्या दारात गायींचा गोठा

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. हे सर्वांनाच माहित आहे. ही मुंबई सर्वांना सामावून घेते हे देखील खरे आहे. या शहरातील अतिश्रीमंत (cow shed) भागात तसेच ज्या ठिकाणी सरकारी खात्यांची मुख्यालये आहेत.

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. हे सर्वांनाच माहित आहे. ही मुंबई सर्वांना सामावून घेते हे देखील खरे आहे. या शहरातील अतिश्रीमंत (cow shed) भागात तसेच ज्या ठिकाणी सरकारी खात्यांची मुख्यालये आहेत. त्या परिसरात गुरांचा गोठा असेल तर कोणालाही आश्चर्य वाटू शकते. चर्चगेटमध्ये असेच एक ठिकाण आहे. या ठिकाणी दुरसंचार विभागाचे कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला गायी बांधलेल्या दिसतात. त्या ठिकाणी एक प‍िंपळाचे झाड आहे. त्या झाडाजवळ तीन चार गायी बांधलेल्या असतात. येणारे जाणारे त्या गायींना खायला घालतात. अनेक श्रध्दाळू लोक त्यांचे मनोभावे दर्शन घेतात. मात्र ही गुरे दूरसंचार विभागाच्या मुख्य दरवाज्यामध्ये बांधलेली असल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटते.

मात्र दूरसंचार विभाग, तसेच मुंबई महानगर पालिका याकडे लक्ष देत नाही. या गायी बांधून ही गरीब माणसे चार पैसे कमवतात. त्यामुळे ही गोष्ट कोणी फारशी गाभीर्यांने घेत नाही. कोणी त्यांना तिथून उठवत नाही. हा माणूसकीचा भाग सोडला तर अनेक प्रश्न या निमित्ताने‍ उपस्थित होतात. महानगर पालिकेच्या स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईचा उद्देश देखील यामुळे सफल होत नाही. अशा प्रकारे गायींना चारा खाऊ घालून पोट भरणारे आपल्याला मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये दिसतात. मात्र शासनाचे याकडे लक्ष नाही हेच यावरून अधोरेखीत होते.

या लोकांना दुसरा कोणातरी उद्योग, व्यवसाय देऊन त्यांचे कोणीच पुर्नवसन का करत नाहीत? मुंबईत विलेपार्ले, दादर, अंधेरी, चर्चगेट, चर्नीरोड, गिरगाव इत्यादीसह अनेक भागात आशा गायी रस्त्याच्या कडेला बांधलेल्या दिसतात. या लोकांनी पालिकांचे पदपथ आडवले आहेत. या गायीमुळे लोकांना खाली उतरून जावे लागते. अनेकांना गायींची भीत वाटते. अनेक ठिकाणी मंद‍िरांच्या परिसरात देखील गायी बांधलेल्या द‍िसतात.

शेण आणि गोमुत्रामुळे पदपथावरुन चालणे अवघड होते. पावसाळयात तर परिस्थिती आणखी बिकट होते. शिवाय मच्छारांचा प्रादुर्भाव वाढण्यास देखील यामुळे मदत होते. सरकारने आपल्याच दारात तयार केलेल्या गायींच्या गोठयांचे पुर्नवसन करण्याची जबाबदारी घ्यायला हवी असे नागरिकांना वाटते. हिंदू धर्मात गायीला गो-माता मानतात. गायीच्या गायीमध्ये तेहतीसकोटी देवता वास करतात. अशी अनेकांची श्रध्दा आहे. तसेच अनेक जण अडीअडचणी दूर व्हाव्यात या करता धार्मीक उपाय म्हणून गायीला चारा खाऊ घालतात. जेवण खाऊ घालतात. धार्मीक विधी पार पाडल्यानंतर गायींना घास खाऊ घालतात. हे सगळं बरोबर आहे. मात्र सरकारी ऑफ‍िसच्या बाहेर गायी बांधलेल्या दिसतात हे आश्चर्यकारक आहे. अशा प्रकारे तुटपूंज्या पैशात पोट भरणाऱ्या गरजूंसाठी सरकारने गोठे बांधून दिणे गरजेचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी