महाराष्ट्र

Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरता, तुमच्यात एकवाक्यता नाही का ? अजित पवारांचा सवाल

महाराष्ट्रात पुरग्रस्त परिस्थिती आहे. लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. कारभार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मंत्रीमंडळाची गरज आहे. एक महिना उलटून गेला तरी मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाही. विस्तार करायला तुम्ही का घाबरता. तुमच्यात एकवाक्यता नाही का ?, असा बोचरा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित केली जात नाही. साधारण जून – जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाते. आता ऑगस्ट महिना सुरू झाला तरी अधिवेशन बोलाविले जात नाही. राज्यात कसले सरकार सत्तेत आले आहे, याचा आता जनतेनेच विचार करावा, असाही सल्ला अजित पवार यांनी दिला.

बारामतीमध्ये पत्रकारांशी अजित पवार यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मी महाराष्ट्राचे अनेक दौरे केले. महाराष्ट्रात पुराची परिस्थिती चिंताजनक आहे. भुजबळ साहेबांसोबत आम्ही राज्यपालांना भेटलो. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. त्यांना महाराष्ट्रातील समस्या सांगितल्या.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी स्वत:चाच निर्णय केला रद्द, शिवसेना आमदाराचे टीकास्त्र

‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’-अजित पवार

अख्खं गाव चार दिवस पाण्यात; अजित पवारांनी घरात जाऊन अश्रू पुसण्याचा केला प्रयत्न !

पावसामुळे पिकं उद्धवस्त झाली आहेत. गोगलगायींचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आहे. पाळीव जनावरे मेली आहेत. घरांची पडझड झाली आहे. पूल तुटले आहेत. रस्ते उखडून गेले आहेत. पुरामुळे राज्यात अशी भयावह परिस्थिती झाली आहे.
ही परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्र्यांची गरज आहे. मंत्री नसल्यामुळे पूर परिस्थिती व्यवस्थित हाताळली जात नाही. लोकांना संकटातून दिलासा देण्यास नव्या सरकारला अपयश आले आहे, असे अजित पवार म्हणाले.

लोकांचे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या त्या खात्याचा मंत्री असेल तरच संबंधित व्यक्तींना आपले प्रश्न घेवून मंत्र्यांकडे जाता येईल. पण मंत्रीच नसल्याने प्रश्न मांडायचे कोणाकडे ? अशी पंचाईत होत आहे. मंत्रालयातील अनेक सचिवांशी मी बोललो. पुरपरिस्थितीबाबत काही निर्णय घेण्याची त्यांना विनंती केली. पण मंत्री नाहीत. मंत्र्यांच्या परवानगीशिवाय एखादा निर्णय आम्हाला घेता येत नाहीत, अशी कैफियत सचिव पदांवरील अधिकारी मांडत असल्याकडे सांगत अजित पवार यांनी लक्ष वेधले. दरम्यान, याआधी सुद्धा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नव्या सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही न केल्याने यांवर प्रश्न उपस्थित केले होते.

पूनम खडताळे

Recent Posts

विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेस प्रारंभ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (University) संलग्नित महाविद्यालयातील पदवीपूर्व अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या तृतीय शैक्षणिक वर्षात असलेल्या…

5 mins ago

बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कारवाईला सुरुवात

शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना…

25 mins ago

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे

उन्हाळा सुरु झालाय तर उन्हाळ्यात आपल्याला काही न काही थंड पियायच असतं  तर त्या साठी…

2 hours ago

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

4 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

5 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

17 hours ago