29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्र'महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले'-अजित पवार

‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’-अजित पवार

टीम लय भारी

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यात सर्वत्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोशल मीडियावर भगतसिंह कोश्यारी यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक अभंग सादर केला आहे.
महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले

खरा वीर वैरी पराधिनतेचा.

महाराष्ट्र आधार या राष्ट्रचा……..हे लक्षात ठेवावे

अजित दादांनी आपल्या शैलीत राज्यपाल कोश्यारींची कानउघडणी केली आहे. मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेवून जाण्याची महाराष्ट्रची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करु नये.

यापूर्वी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  महाराष्ट्राविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांनी छ. शिवाजी महाराज तसेच ज्योतीबा फुुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र राज्यपाल कोश्यारी आपला स्वभाव सोडण्यास तयार नाहीत. ते सातत्याने नवे नवे वादग्रस्त विधान करत राहतात.

हे सुध्दा वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ‘आगडम तगडम‘ काम नको

राज्यपालांना कोल्हापूरचा जोडा दाखविण्याची गरज : उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे असते तर, राज्यपालांना धुतलं असतं

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!