महाराष्ट्र

Ambadas Danve: एकनाथ शिंदे राजकारणात गुंग, शेतकरी करताहेत आत्महत्या; अंबादास दानवेंचा घणाघात!

महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा हा नेहमीच गंभीर समस्या बनून सरकारी यंत्रणासमोर भेडसावत असते. महाराष्ट्रातील विविध जिल्हयात विशेषत: दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या सातत्याने नोंदी होत आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) सध्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या भेटी दरम्यान दानवे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर सडकून टीका करत म्हणाले की, सत्तेत आल्यावर राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी आत्महत्येनंतरही वैदयकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असलेला व्हिसेरा रिपोर्ट निरंक येत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर शेतकऱ्याच्या मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.

हे सुद्धा वाचा –

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, सत्ता नसली तरी कामे करणार

Ambadas Danve : सरकारने अंबादास दानवे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

चंद्रशेखर बावनकुळे यांची ताकद वाढली, थेट नरेंद्र मोदी…

आधीच घरातील कर्ता पुरुषाने आत्महत्या केल्याने खचलेल्या शेतकरी कुटुंबियांना सरकारी दरबारी मदतीसाठी हेलपाटे घालावे लागत असल्याचे निदर्शनास आले. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या घरी जाऊन शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराईत कॉफी शॉप मध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पीडित मुलीची व कुटुंबियांचीही भेट घेऊन शोक प्रकट करुन संवेदना व्यक्त केली.

आमचा यू ट्यूब चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करा –

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

1 hour ago

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

17 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

17 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

18 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

18 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

20 hours ago