31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रAshok Chavhan : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची अशोक चव्हाण यांची मागणी

Ashok Chavhan : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची अशोक चव्हाण यांची मागणी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना आता तरी ही नुकसान भरपाई द्यावी असे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास उध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. पण आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना आता तरी ही नुकसान भरपाई द्यावी असे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले आहे. ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या गोष्टीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागामध्ये पार्टीच्या पावसाने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीतून वाचलेली पिके आता मात्र परतीच्या पावसामुळे उद्धवस्त झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील परतीच्या पावसाने उच्छाद मांडला. या जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात गुडगाभर पाणी साचले. परंतु काढणीला आलेल्या या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. ज्यामुळे राज्य सरकारने तातडीने या गोष्टीचे पंचनामे करावे आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे.

Sanjay Raut Bail : राऊतांची दिवाळी अंधारातच! जामीन अर्जावरील सुनावणी स्थगित

AGNI Prime New : संरक्षण क्षेत्रात भारत ‘आत्मनिर्भर’; अग्नी प्राइम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Anil Deshmukh Bail : अनिल देशमुखांचा जामिन नामंजूर! कारागृहातच करणार दिवाळी साजरी

नांदेड जिल्ह्यात देखील सोयाबीन सारखे प्रमुख पीक शेतकऱ्यांना गमवावे लागले आहे. परतीच्या पावसामुळे कापसाची बोंडे पिवळी पडली आहेत. तसेच ज्वारी देखील काळी पडली आहे. कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या केळीचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातीला झालेल्या अतिवृष्टीचा पीक विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. विमा कंपन्यांनी भरपाईची अग्रिम रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा व असंतोष निर्माण झालेला आहे. या भयावह परिस्थितीची राज्य सरकारने दखल घेऊन तातडीने हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत जाहीर करावी, असेही अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी