32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रPune Dog News : पुण्यात दिवाळीमध्ये कुत्र्यांना घालण्यात येणार अभ्यंगस्नान

Pune Dog News : पुण्यात दिवाळीमध्ये कुत्र्यांना घालण्यात येणार अभ्यंगस्नान

यंदाच्या वर्षी पुण्यातील लोकांसोबतच तेथील कुत्र्यांची दिवाळी देखील विशेष पद्धतीने पहिल्यांदाच साजरी करण्यात येणार आहे. पुण्यात असलेल्या टेल्स ऑफ द सिटी यांच्याकडून या विशेष दिवाळी पहाटचे आणि दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे कुत्र्यांसाठी आयोजन करण्यात आले आहे.

पुणे तिथे काय उणे ही म्हणं किंवा वाकप्रचार हा सर्वांनाच माहित आहे. पुणेकर हे कधी काय करतील ? याचा कोणीच अंदाज देखील लावू शकत नाहीत. पुणेकरांच्या विशेष शैलीतील पाट्या या तर सगळीकडेच प्रसिद्ध आहेत. पण आता पुणेकरांनी एक आगळी वेगळी भन्नाट कल्पना यंदाच्या दिवाळीला करण्याचे ठरवले आहे. पुणेकर हे प्राणी प्रेमी आहेत. पुण्यात राहणाऱ्या बऱ्याच लोकांकडे कुत्रे (Dog) आहेत. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे ते आपल्याकडे असणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेत असतात. पण यंदाच्या दिवाळीमध्ये पुणेकरांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कुत्र्यांना दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नान घालण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय यंदाच्या वर्षी पुणेकर हे आपल्या कुत्र्यांसोबत दिवाळी पाहत देखील साजरे करणार आहेत. यासाठी पुणेकरांकडून कुत्र्यांसाठी विशेष अशा दिवाळी पहाटचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी पुण्यातील लोकांसोबतच तेथील कुत्र्यांची दिवाळी देखील विशेष पद्धतीने पहिल्यांदाच साजरी करण्यात येणार आहे. पुण्यात असलेल्या टेल्स ऑफ द सिटी यांच्याकडून या विशेष दिवाळी पहाटचे आणि दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे कुत्र्यांसाठी आयोजन करण्यात आले आहे. टेल्स ऑफ द सिटी या ठिकाणी कुत्र्यांचे ग्रूमिंग केले जाते. तसेच हे कुत्र्यांचे केअर सेंटर देखील आहार. याठिकाणी कुत्र्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देखील दिले जाते.

Video : अनन्या पांडे अन् आदित्य कपूर एकमेकांना करतायत डेट! फोटो पुन्हा व्हायरल

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

Eknath Shinde : ‘बळीराजा खचू नको;शासन आहे पाठीशी’, एकनाथ शिंदेंची ग्वाही

पुण्यातील ज्या ज्या प्राणी प्रेमींकडे कुत्रे आहेत. ते याठिकाणी आपल्या कुत्र्यांना घेऊन येत असतात. याठिकाणी कुत्रे आपला बराचसा वेळ घालवतात. खेळणे, पोहणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी कुत्र्यांना या केअर सेंटर मध्ये शिकवल्या जातात. त्यामुळे नवीन काही तरी म्हणून या पेट केअर सेंटरकडून कुत्र्यांसाठी विशेष दिवाळी आयोजित करण्यात आली आहे. दिवाळीच्या पाच दिवसात पुणेकरांना आपल्या कुत्र्यांसोबत ही विशेष दिवाळी साजरी करता येणार आहे. दिवाळीचे पाच दिवस टेल्स ऑफ द सिटीकडून कुत्र्यांचे अभ्यंगस्नान आणि दिवाळी पहाटचे आयोजन केले गेले आहे.

दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे माणसांसाठी विविध अभ्यंगस्नानाचे विविध प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कुत्र्यांसाठी देखील तेल, साबण, शॅम्पू, मसाज पॅक, खेळणी अशा विविध गोष्टी असलेला अभ्यंगस्नानाचा पॅक बाजारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी कुत्र्यांना शॅम्पू, साबण आणि मसाज पॅक लावून त्यांना देखील अभ्यंगस्नान घालण्यात येणार आहे. दिवाळीमध्ये अनेक प्राणी प्रेमी यांना त्यांच्या घरात कुत्रे, मांजरी असल्याकारणाने घराच्या बाहेर जाऊन दिवाळी साजरी करता येत नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी टेल्स ऑफ द सिटी कडून या विशेष दिवाळीचे आयोजन प्राणी प्रेमी पुणेकर आणि त्यांच्या कुत्र्यांसाठी करण्यात आले असल्याची माहिती टेल्स ऑफ द सिटीकडून देण्यात आलेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी