31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रदैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचे निधन

दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचे निधन

महाराष्ट्रातील दलित अस्मितेची प्रमुख ओळख असेलल्या दैनिक वृत्तरत्न सम्राटचे (Daily Samrat) संपादक बबन कांबळे (Baban Kamble) यांचे बुधवारी (दि. 8) रोजी आजारपणामुळे निधन झाले. ठाण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Baban Kamble Editor Of Daily Samrat passed away)

अत्यंत कष्टातून त्यांनी दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरु केले होते. बबन कांबळे हे या वृत्तपत्राचे मालक, संपादक आणि प्रकाशक देखील होते. आपल्या अपार मेहनतीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दैनिक सम्राटची एक वेगळी ओळख निर्मान केली होती. दैनिक सम्राट मधून त्यांनी दलितांचे प्रश्न, समस्यांना वाचा फोडली. त्यांनी दैनिक नवाकाळ या वर्तमानपत्रात पत्रकारीता करत असताना ती नोकरी सोडून दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरु केले.

हे सुद्धा वाचा

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर!

अदानीवरून राहुल गांधींचे पंतप्रधानांना 7 प्रश्न; मोदी सरकारची कोंडी!

शिंदे सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून, फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प!

वृत्तपत्र सुरु करणे हे खरे तर शिवधनूष्य पेलण्यासारखे अवघड काम! मात्र अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये बबन कांबळे यांनी दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरू केले. ते केवळ नावापूरते न चालवता राज्यभरात ते वितरण करण्याच देखील ते यशस्वी झाले. एक निर्भिड संपादक अशी त्यांची राज्यभरात ओळख होती. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून अनेकदा सडेतोड भूमिका मांडली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी