31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराष्ट्रीयतुमचे लव्ह मॅरेज झाले, बेरोजगारीमुळे माझे लग्न अडले; स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या...

तुमचे लव्ह मॅरेज झाले, बेरोजगारीमुळे माझे लग्न अडले; स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलीचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र!

देशभरात सध्या वाढत्या बेरोजगारीचे मोठे संकट आहे. त्यातच नोकरभरती देखील होत नसल्याने तरुण वर्गामध्ये मोठी निराशेची भावना निर्मान झाली आहे. स्पर्धा परीक्षांचा वर्षानुवर्षे अभ्यास करुन देखील भरतीच्या जाहिराती निघत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पिंकी नावाच्या एका मुलीचे उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. पत्रात मुलीने लेखक प्रभात बांधूल्य यांच्यावर मी एकतर्फी प्रेम करते, नोकरी नसल्याने खुप टेंशनमध्ये आहे, असे सांगत काही तरी नोकरीचे जुगाड लावा असे म्हटले आहे. (Tejashwi Yadav to letter from Bihar’s Girl Difficulty in marriage due to lack of job)

बिहारच्या (Bihar) पाटण्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पिंकी नावाच्या एका मुलीने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. त्यात तीने मी खुप टेंशनमध्ये असल्याचे म्हटले आहे. तुम्ही तर लव्ह मॅरेज केले पण माझे लग्न (marriage) बेरोजगारीमुळे अडले आहे, असे सांगत मी चार वर्षांपासून लेखक प्रभात बांधुल्य यांच्यावर एकतर्फी प्रेम करत आहे. वाटले होते नोकरी (job) लागल्यास त्याला प्रपोज करेन. मात्र नोकरीच लागली नाही, असे पिंकीने उपमुख्य मंत्री तेजस्वी यादव यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

अदानीवरून राहुल गांधींचे पंतप्रधानांना 7 प्रश्न; मोदी सरकारची कोंडी!

शिंदे सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून, फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प!

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकाराची राजापुरात हत्या ; पोलिसांनी आरोपी आंबेरकरच्या मुसक्या आवळल्या

तीने पत्रात म्हटले आहे की, एक तर वॅकन्सी नाहीत, आणि वॅकन्सी निघाल्याच तर पेपर लिक होतात. हे सगळे पाहून असे वाटते की, व्हॅलेंटाईन्स डे देखील असाच निघून जाईल आणि माझे प्रपोज करण्याचे देखील राहून जाईल. मी इकडे परीक्षेची तयारी करत आहे, तर वडील माझ्या लग्नाच्या विचारात आहेत. माझ्या सर्व मैत्रीणींची लग्ने होऊन त्यांना मुले देखील झाली. हा सगळा विचार करुन मन खुपच नाराज झाले आहे. मोठ्या आशेने तुम्हाला चिठ्ठी लिहीत आहे. नोकरीचे जुगाड लागले नाही तर लेखक साहेब कुणाशीतरी जुगाड लावून फरार होतील. प्रेम नसेल तर नोकरी लागून काय उपयोग? असे म्हणत पत्राच्या शेवटी तीने आपली मतदार आणि लेखक प्रभात बांधूल्य याची एकतर्फी प्रेमिका पिकीं फ्रॉम पाटना, सस्नेह आभार म्हटले आहे.

( हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून या पत्राच्या सत्यतेबाबत आम्ही पुष्टी करत नाही.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी