महाराष्ट्र

Bharat Jodo Yatra : ‘सावरकरांबद्दल काँग्रेस-सेनेची मते वेगळी पण…’ जयराम रमेश यांचे विधान

भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुलजी गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत हे सांगताना त्याची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

शेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, सावरकारांच्या मुद्दयावरून महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोड़ो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात सावरकर यांनीच मांडला.१९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Khadse : बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटी म्हणजे प्रेयसीच्या आठवणीप्रमाणे : एकनाथ खडसे

Bhima Koregaon Case : आनंद तेलतूंबडे यांना जामीन मंजूर; पण काही दिवस तुरूंगातच रहावे लागणार

Mumbai Local Megablock: लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; उद्यापासून 27 तासांचा मेगाब्लॉक

भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याने काही लोक विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुलजी गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही.

भारत जोडो यात्रेत 19 तारखेला नारीशक्तीचा
स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त शनिवारी ता. 19 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत 90 टक्के महिलांचा सहभाग असेल. महिलांचा राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी घेतला यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देशभर महिलांचे प्रतिनिधित्व वाढलेले आहे. उद्या नारीशक्तीची भव्य दर्शन भारत जोडो यात्रेत दिसेल असे जयराम रमेश यांनी सांगितले.

प्रणव ढमाले

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

14 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

14 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

15 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

15 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

17 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

18 hours ago