प्रतिविधानसभेवर भास्कर जाधवांचा आक्षेप; त्यांचे माईक जप्त करा

टीम लय भारी

मुंबई :- विधिमंडळाच्या दुसऱ्या आणि अंतिम अधिवेशनाच्या कामकाजावर भाजपने बहिष्कार टाकला आहे. यानंतर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवली आहे. प्रतिविधानसभेसाठी अध्यक्षांची परवानगी घेतली का ते पाहा, नसेल तर संबंधितांवर कारवाई करा, तसेच त्यांचे माईक जप्त करा असे भास्कर जाधव म्हणाले आहेत (Bhaskar Jadhav has said seize the mic).

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवली आहे. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत ते म्हणाले, विधानसभेच्या पायरीवर बसण्याचा निश्चित अधिकार आहे. तिथे घोषणाबाजी करण्याच देखील अधिकार आहे. परंतु संसदीय कामकाज चालू असताना स्पीकर लावून मोठमोठ्याने घोषणा देणे आणि तश्या प्रकारचे आंदोलन करणे यासाठी अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसेच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली (Deputy Speaker of the Legislative Assembly Narhari Jirwal).

“केलं तुका झालं माका” संजय राऊत यांचा भाजपला टोला

नारायण राणे तातडीने दिल्लीत रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. आज सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी घेतला.

भाजपची प्रतिविधानसभा

आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून निलंबन केले; देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly: 12 BJP MLAs suspended for 1 year for ‘misbehaving’ with presiding officer

भाजपची प्रतिविधानसभा

विधानसभेत किंवा विधान परिषदेत न जाता विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसूनच भाजपने प्रति विधानसभा भरवले आहे. या प्रति विधानसभेच्या अध्यक्षपदावर भाजपाचे वरिष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांना बसवण्यात आले. तसेच पहिल्यांदा बोलण्याची संधी राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आली. विखे पाटलांनी विविध मुद्द्यांवरून आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Rasika Jadhav

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

4 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

5 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

5 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

5 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

5 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

9 hours ago