29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीय"केलं तुका झालं माका" संजय राऊत यांचा भाजपला टोला

“केलं तुका झालं माका” संजय राऊत यांचा भाजपला टोला

टीम लय भारी

मुंबई :- काल विधानसभा अध्यक्षांसोबत गैरवर्तन केल्यामुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबन करण्यात आले आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधा पक्षांचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासर्व प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले विरोधकांचे अस झाले की, केलं तुका झालं माका असा टोला भाजपला लगावला आहे (Sanjay Raut said that the BJP has imposed a toll on the opposition).

भाजपच्या 12 आमदारांना निलंबन करण्यात आले आहे. याचे समर्थन संजय राऊत यांनी केले आहे. माध्यमांशी संवाद साधतांना संजय राऊत म्हणाले, काल सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. वेगळ्या प्रकारे कोंडी करणार होते. पण मराठीत एक म्हण आहे. केले तुका झाले माका, अशी कोकणात म्हण आहे. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते. पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला. एक चूक किती महागात पडू शकते हे त्यांच्या लक्षात आले असेल, असे संजय राऊत यावेळी म्हणाले (He must have realized how costly a mistake can be, said Sanjay Raut).

नारायण राणे तातडीने दिल्लीत रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित

आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून निलंबन केले; देवेंद्र फडणवीस

यानंतर संजय राऊत म्हणाले 12 आमदारांना का निलंबित केले? त्यांचे जे वर्तन होते ते तुम्ही पाहिले असेल. मी तर सभागृहात नव्हतो. पण विरोधक कशाप्रकारे वागले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. ते वेलमध्ये गेले. भास्कर जाधव तालिका समितीचे अधक्ष आहेत. त्यांना विरोधकांनी शिवीगाळ केली. धक्काबुक्की केली असे ते म्हणाले. त्यामुळेच त्यांना निलंबन केले असे नाही केले तर महाराष्ट्राच्या विधानसभेत दंगली होतील.

Sanjay Raut said that the BJP has imposed a opposition
संजय राऊत

विधानसभेतून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन

Shiv Sena MP Sanjay Raut justifies suspension of 12 Maharashtra BJP MLAs; BJP protests

या अशा प्रकारमुळे पाकिस्तानच्या संसदेत, यूपी आणि बिहारच्या सभागृहात दंगली होताना आपण पाहिले असेल. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडले नाही. महाराष्ट्रात ही परंपरा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असेल. अशा प्रकारचे वर्तन होऊ नये म्हणून हा कठोर निर्णय घेतला असेल, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत (This may have been a tough decision to prevent such behavior, said Shiv Sena leader Sanjay Raut).

https://youtu.be/vacASVsHa-o

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी