28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयनारायण राणे तातडीने दिल्लीत रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित

नारायण राणे तातडीने दिल्लीत रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित

टीम लय भारी

मुंबई :- दुसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यापासून एकदाही मंत्री मंडळाचा विस्तार झाला नाही आहे. मात्र आता मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या केंद्रीय विस्तार मंडळात राज्यसभा खासदार नारायण राणेंना जागा मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे (It is almost certain that Narayan Rane will get a seat).

उद्या केंद्रीय मंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून खासदार नारायण राणे फोन करण्यात आला होता. तसेच राणेंना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंना जागा मिळणे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (Sources have informed that it is almost certain that Narayan Rane will get the seat).

आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून निलंबन केले; देवेंद्र फडणवीस

सुधीर मुनगंटीवारींची अनिल देशमुखांना सभागृहात धमकी

नारायण राणे यांचे नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होते. दिल्लीत राणेंची जे. पी. नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच 7 जुलै रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

It is almost certain that Narayan Rane will get a seat
नारायण राणे

विधानसभेतून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन

Amid speculation of impending Cabinet reshuffle, Narayan Rane likely to get Cabinet seat in Modi govt

राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी काल सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी त्यावर हसून प्रतिक्रिया दिली असे काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्र येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही. तोपर्यंत जरा धीर धरा, असे नाराय राणे यांनी हसत सांगितले होते (Just be patient, said Narayan Rane with a smile).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी