28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रआमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून निलंबन केले; देवेंद्र फडणवीस

आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून निलंबन केले; देवेंद्र फडणवीस

टीम लय भारी

मुंबई :- यंदाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. यावेळी विधानसभा अध्यक्षांसोबत गैरवर्तन केल्यामुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबन करण्यात आले आहे. आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून त्यांना निलंबित करण्यात आले आहे असा आरोप विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत (Devendra Fadnavis suspended our MLAs on false charges).

भाजपच्या 12 आमदारांना निलंबन केल्यानंतर, आम्ही या निर्णयाचा जाहीर निषेध करतो असे म्हणत भाजपचे सर्व नेते बाहेर निघाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. आमच्या पक्षाचे संख्याबळ कमी व्हावे म्हणून आमच्या आमदारांना निलंबन करण्यात आले आहे. आमच्या आमदारांना निलंबन करण्यासाठीच सरकारच्या मंत्र्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्टोरी रचली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे (Opposition leader Devendra Fadnavis has accused government ministers of fabricating stories of abusive language and pushback).

विधानसभेतून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन

विरोधी पक्षनेते अध्यक्षांच्या दालनात आक्रमक, घोषणाबाजीने दालन घुमल

यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडे पाडले. सरकारमुळे आरक्षण कसे गेले हे आम्ही दाखवून दिले. त्यामुळे आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आमच्या आमदारांना निलंबित केले जाईल, ही माझी शंका होती. ती खरी झाली. ओबीसींसाठी 12च आमदार काय आमच्या 106 आमदारांना निलंबित केले तरी आम्ही लढा देत राहू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

विरोधकांची सभागृहातही मुस्कटदाबी होते; फडणवीस आक्रमक

12 BJP MLAs suspended from Maharashtra Assembly for 1 year

आमच्या एकाही आमदाराने शिवीगाळ केला नाही. शिवी देणारे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेच्या सदस्यांनीच धक्काबुक्की गेली. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले. आमच्या आक्रमक आमदारांना आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला. उलट आशिष शेलार यांनी या सर्व आमदारांच्या वतीने अध्यक्षांची माफी मागितली. त्यांची गळाभेटही घेतली. तो विषय संपल्यावर आम्ही बाहेर आलो होतो. पण आमच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी सरकारच्या मंत्र्यांनी स्टोरी रचली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Devendra Fadnavis suspended our MLA on false charges
देवेंद्र फडणवीस

भाजपचे या 12 आमदारांना केले निलंबन

गिरीश महाजन, आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, किर्तीकुमार बागडीया या आमदारांना निलंबन करण्यात आले आहे. आम्ही या निर्णयाचा जाहिर निषेध करतो असे म्हणत भाजपचे सर्व नेते बाहेर आले होते. यानंतर निलंबन झालेले 12 अमादार आणि भाजपच्या नेत्यांनी एक बैठीक घेतली (The 12 suspended MLAs and BJP leaders held a meeting).

Devendra Fadnavis suspended our MLAs on false charges
भाजपचे निलंबित आमदार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी