महाराष्ट्र

‘भाजपला एकनाथ शिंदे नकोसे’

टीम लय भारी

मुंबईः भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक आश्चर्यजनक ट्विट केले आहे. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ‘आम्ही मनावर दगड ठेवून, आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले’. आपल्याला दुःख झाले. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो. कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. आशा प्रकारे भाजपच्या वरिष्ट नेत्याने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. त्यामुळे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा यांनी गाजर दाखवण्यासाठी ही कुटनिती केली. हे सर्वांना माहित पडले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होवून आता तिन आठवडे झाले. तरीही शपथ विधी होत नाही. शिवसेने संबंधीत वादग्रस्त प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. राज्यात सध्या दोन डोक्यांचे सरकार आहे. त्यात मुख्यमंत्री पदावर डोळा असलेल्या भाजपला दोन पावलं मागे येवून उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे ही खदखद सुरु आहे. हेच चंद्रकांत पाटील माध्यमांसमोर सांगत होते की, एकनाथ शिंदेच्या बंडामध्ये भाजपचा हात नाही. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पती पत्नीने आपण कसे गनिमी काव्याने एकनाथ शिंदेना भेटत होतो. याच्या सुरस कथा सांगितल्या अजून काही सांगण्याचे बाकी आहे. ते वेळ मिळेल तेव्हा सांगतील यात शंकाच नाही.

शिंदे-फडणवीस सरकामध्ये आपल्याला कोणती मंत्री पदे मिळणार? आपल्याला निधी कधी मिळणार? किती मिळणार याची उत्सुकता आहे. ते असंतुष्ट आहेत. त्यांच्या पोटात कालवा कालव सुरु आहे. त्या असंतोषातूनच चंद्रकांत पाटलांच्या तोंडातून सत्य बाहेर आले.

हे सुध्दा वाचा:

ममता बॅनर्जीचे दोन ‘मंत्री’  ईडीच्या रडारवर

शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही – शरद पवार

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

रूपाली केळस्कर

Recent Posts

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

17 mins ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

1 hour ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

2 hours ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

2 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

2 hours ago

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस गृहभेटीला

मानवी जीवनाच्या अर्ध्या टप्प्यावर आयुष्याचा लेखाजोखा मांडत असताना प्रेम, आपुलकी, स्नेह, आत्मीयता, आदर व ईश्वर…

2 hours ago