31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रशासनाला दिल्या...

Eknath Shinde : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रशासनाला दिल्या सूचना

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. पुढील चार -पाच द‍िवस हवामान विभागाने राज्यात विशेषत: कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडू शकतो. त्या संदर्भात हवामान विभागाने इशारा दिला आहे. कुठलीही आपत्ती आली तर मदत तयार ठेवावी अशा सूचना संबंधीत कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. काल काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडला. त्यामुळे त्यांनी या सुचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथ्कांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.
हे सुद्या वाचा :

Urvashi Raitela : उर्वशी रैतेला आली गणेश दर्शनाला, भक्तांनी दिल्या ऋषभ पंतच्या घोषणा !

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा ‘भाला’ सुसाट, आतापर्यंत कमावले ‘इतके’ पदक

Virat Kohli : अजूनही माझ्यात‍ क्रिकेट बाकी; ७१ वे शतक झळकल्यानंतर‍ विराट कोहलीचं वक्तव्य

या वर्षी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापूर आले. मात्र अद्याप महापुरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. मुंबईची दरवर्षी प्रमाणे यंदा तुंबई झाली नाही. आता काही दिवसांतच परतीच्या पावसाची सुरूवात होणार आहे. कारण परतीच्या पावसाचे संकेत मिळत आहेत. जाता जाता हा पाऊस अनेक ठिकाणी जोरदार बरसू शकतो. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी