31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रहसन मुश्रीफ - चंद्रकांत पाटील पुन्हा आमने - सामने

हसन मुश्रीफ – चंद्रकांत पाटील पुन्हा आमने – सामने

प्रशांत चुयेकर : टीम लय भारी

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Chandrakant Patil Vs Hasan Mushriff ) यांचे शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा सुरू झाले आहे. माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्री असताना मुश्रीफ यांना दरवेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता चंद्रकांतदादा विरोधी पक्षात आहेत, अन् मुश्रीफ मिळेल त्या ठिकाणी दादांवर टीका करण्याची संधी साधतात.

‘कोरोना’सारख्या संकटात ‘दादांनी कोल्हापुरातील माणसे मेली आहेत की जिवंत आहेत आहेत, हे तरी बघावं’ अशी टीका नामदार मुश्रीफ ( Chandrakant Patil Vs Hasan Mushriff ) यांनी केली. जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यासाठी योग्य ते सहकार्य केले आहे.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ समजल्या जाणारे कागलचे आमदार आणि मंत्री मुश्रीफ यांनी दादांवर  ( Chandrakant Patil Vs Hasan Mushriff ) जोरदार टीका केली. या टीकेची चर्चा जिल्ह्यासह राज्यात होऊ लागली आहे.

नामदार मुश्रीफ यांच्या टीकेनंतर भाजपचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आम्ही मदत केल्याची पत्रकबाजी केली. असे असले तरी चंद्रकांतदादा यांना नामदार मुश्रीफ यांनी टोला हाणल्यामुळे तो भाजपच्या जिव्हारी लागला आहे.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनीसुद्धा सत्ता असताना मुश्रीफ यांची चौकशी लावली होती. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादांवर चिडून होते. मुश्रीफ यांच्या टीकेला उत्तर देणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर ते सुद्धा पत्रकबाजी करून तुटून पडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुश्रीफ व चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Vs Hasan Mushriff ) यांचा सामना रंगला आहे.

‘कोरोना’ covid-19 हा विषाणू नष्ट करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू असतानाच मुश्रीफ – दादा पाटील यांच्या कटूतेचा अदृश्य विषाणू कधी नष्ट होणार याबाबतही चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा

बापरे : पोलीस आयुक्तालयात शिरला कोरोना!

शिवसेना खासदारांनी होम क्वारंटाईनसाठी दिलं स्वतःचं घर

Coronavirus : कोरोनाचा विळखा! मंत्रालय हादरले!

Politics : रोहित पवारांची बॅटींग भक्तांना लागली जिव्हारी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी