एकनाथ शिंदे दावोसमध्ये जाऊन ठाकरेंवर करणार मात !

एकनाथ शिंदे दावोसमध्ये जाऊन ठाकरेंवर मात करणार आहेत. (CM Eknath Shinde To Beat Uddhav Thakre in Davos Economic Council Switzerland) दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार आहेत. याशिवाय, ते गुंतवणूकदारांच्या भेटीगाठी व मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 16 आणि 17 जानेवारी असे दोन दिवस या परिषदेत उपस्थित राहतील. मात्र, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस परिषदेला दांडी मारणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षी स्वित्झर्लंड येथील दावोस जागतिक आर्थिक परिषदेतून एकूण 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत या परिषदेसाठी गेले होते. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: उद्योग मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. या परिषदेतून शिंदे सरकार हे 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार करणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी गुंतवणूक यावेळी दावोस परिषदेतून येणार आहे. याशिवाय, पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. ही परिषद 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. कोरोनामुळे दावोस परिषदेच्या मागील दोन बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. तर 2022 या वर्षातली बैठक जानेवारी ऐवजी मे मध्ये घेण्यात आली होती.

महाराष्ट्रात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर पायाभूत सुविधासह विविध क्षेत्रात झपाट्याने घोडदौड सुरू आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राची नवी बलस्थाने संपूर्ण जगाला कळून राज्याकडे जगाचा ओढा कसा वाढेल, यावर या जागतिक महत्त्वाच्या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. असे असले तरी विरोधक मात्र सरकारवर टीका करीत आहेत. “देशातील सर्व राज्याचे मुख्यमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला जात आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकार राज्यातील गुंतवणुकीबाबत गंभीर नाही. राज्यातील गुंतवणुकीपेक्षा मुंबई निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित पंतप्रधानांचा दौरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटतो,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांचे राज्यात स्वागत करायलाच हवे; पण पंतप्रधानांना विनंती केली असती तर दौऱ्यासाठी त्यांची वेगळी तारीख मिळू शकते. दावोस परिषदेसाठी मात्र दुसरी तारीख मिळणार नाही. याचा अर्थ राज्याच्या प्रमुखांना राज्यात गुंतवणूक आणण्यात रस दिसत नाही,” असेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर आशिष शेलार यांनी राऊतांची प्रतिक्रिया म्हणजे ‘खाई त्याला खवखव’ असल्याचे म्हटले आहे. राऊतांना आता कुणी गंभीरपणे घेत नाही, असा टोलाही शेलारांनी लगावला.

त्यातच 2015 मध्ये नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांना बंदी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे तकालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दावोस जागतिक आर्थिक परिषदेत नेले होते. तेक मोदींच्या मर्जीतील फडणवीस आज दावोस दौरा रद्द करण्याच्या तयारीत आहेत. नियोजनानुसार, फडणवीस हे 15 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दावोसला जाणार होते. मात्र, पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा असल्याने आता फडणवीस यांनी दावोस दौरा रद्द केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्रीही दावोस परिषद अर्धवट टाकून 18 जानेवारीला मुंबईत परत येणार आहेत. मुख्यमंत्री रविवारी, 15 जानेवारी रोजी मुंबईहून झुरिचकडे रवाना होतील. तिथून दावोस येथे जाऊन ते 16 जानेवारी रोजी परिषदेतील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन करतील. यामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीचे अत्याधुनिक पद्धतीने आणि प्रभावी असे प्रदर्शन केले जाणार आहे. त्यात विशेषत: गेल्या तीन ते चार महिन्यात मेट्रो, कोस्टल रोड, एमटीएचएल, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे मिसिंग लिंकसाठी सर्वात मोठा बोगदा तसेच ईलेक्ट्रिक वाहनांचा सार्वजनिक वाहतुकीत करण्यात येत असलेला उपयोग, पर्यावरण संरक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊले अशा अनेक बाबी दाखविण्यात येतील.

हे सुद्धा वाचा : 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस येथे राज्याची ८० हजार कोटींच्या करारांवर स्वाक्षरी

Good News : नवी मुंबई मेट्रोचे 19 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन !

लोढा वर्ल्ड वन लटकली; आता ब्रिटनमधील कंपनी मुंबईत उभारणार देशातील सर्वात उंच इमारत !

मुख्यमंत्री 17 जानेवारी रोजी लक्झमबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, जपान बँक, सौदी अरबचे उद्योग व खनिकर्म मंत्री, स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासमवेत भेटीगाठी घेणार आहेत. याशिवाय, बदलत्या पर्यावरणाचे शहरांच्या विकासापुढील आव्हान आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास यावर मुख्यमंत्र्यांचे संबोधन होणार आहे. मंगळवारीच रात्री महाराष्ट्राच्या वतीने उद्योग, राजकीय, तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांसाठी स्नेहभोजन दिले जाणार आहे.

Mukesh D. Ambani Board of Trustees World Economic Forum
दावोस जागतिक आर्थिक परिषद नेमकी काय आहे ?

जागतिक आर्थिक परिषद (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) ही एक खाजगी संस्था आहे. तिची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हामध्ये आहे. या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे. या संस्थेचे ध्येय जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून जागतिक क्षेत्रिय आणि औद्योगिक विकासाला चालना देणे आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने निमंत्रण दिलेल्यांना यामध्ये सहभागी होता येते. या परिषदेत जवळपास 2500 व्यक्ती सहभाग घेतात. त्यात जगभरातील मोठे उद्योगपती, व्यावसायिक आणि अर्थशास्त्रज्ञ यांचा समावेश असतो.

CM Eknath Shinde To Beat Uddhav Thakre, Davos Economic Council Switzerland, Double Investment For Maharashtra, दावोस जागतिक आर्थिक परिषद, एकनाथ शिंदे ठाकरेंवर करणार मात

 

 

विक्रांत पाटील

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

11 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

11 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

12 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

12 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

18 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

19 hours ago