31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus : गृहमंत्री अनिल देशमुखांची तंबी, ‘सोशल मीडियाचा गैरवापर कराल तर याद...

Coronavirus : गृहमंत्री अनिल देशमुखांची तंबी, ‘सोशल मीडियाचा गैरवापर कराल तर याद राखा’

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या  ( Coronavirus ) आपत्तीमध्ये काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ करीत आहेत. समाजात अराजकता माजवत आहेत. अशा समाजकंटकांविरोधात महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे.

Dhananjay Munde

कोरोना ( Coronavirus ) साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये असा गैरप्रकार वाढला आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या या प्रकारांवर महाराष्ट्र सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना देशमुख यांनी सायबर विभागाला दिल्या आहेत.

सोशल मीडियातून सामाजिक द्वेष पसरविणाऱ्या संदेशांचे पेव फुटले आहे. कोरोनाच्या काळात ( Coronavirus )  एकूण १८३ गुन्हे नोंद झाले आहेत. या गुन्ह्यांपैकी समाज माध्यमांतून द्वेष पसरविणारे ८७ गुन्हे आहेत. यामुळे ३७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ११४ जणांचा सदर गुन्ह्यांमध्ये हात असल्याची खात्रीदायक ओळख पटली आहे.

ताब्यात घेतलेल्यांपैकी ७ जणांविरुद्ध CrPC च्या कलम १०७  नुसार ( समाज-शांती भंग करण्याचा प्रयत्न ) गुन्हा नोंद केला आहे. सर्वाधिक प्रकरणे ( ८८ ) व्हॉट्सॲपच्या गैरवापराचे आहेत. त्या खालोखाल फेसबुक (४९) आहेत. टिक – टॉकच्या गैरवापराच्या ३ केसेस आहेत व ट्विटर संबंधित २ केसेस आहेत.

सायबर सेलने सर्व संबंधित समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्म्सना अशा पोस्ट्स काढून टाकायचे आदेश दिले आहेत. यातील ३२ पोस्ट्स काढून टाकण्यात यश आलं आहे. बाकी पोस्ट्स काढून टाकण्याची प्रक्रिया चालू आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व जनतेस आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या चुकीच्या पोस्ट समाज माध्यमांवर आढळून आल्यास त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये करावी. पोलीस विभाग अशा समाजकंटकांविरुद्ध तातडीने कारवाई करील.

हे सुद्धा वाचा

Lockdown21 : उद्धव ठाकरे – अनिल देशमुखांची धडक कारवाई, बेजबाबदार IPS गुप्तांना पाठविले सक्तीच्या रजेवर

नोटांमधून मुस्लीम कोरोना पसरवित असल्याचा खोटा प्रचार

पाकिस्तानातील व्हिडीओ भारतातील मुस्लीमांच्या नावावर खपवून सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी