31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंना पीएने दिली अनोखी भेट

धनंजय मुंडेंना पीएने दिली अनोखी भेट

टीम लय भारी

मुंबई : धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ( Dhananjay Munde birthday ) त्यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी यांनी एक अनोखी भेट दिली आहे. सामाजिक दायित्व निभावत मुंडे यांना दिलेल्या या भेटीबद्दल जोशी यांचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रशांत जोशी यांना ‘कोरोना’ची लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले. पण राज्यात असे अनेकजण ‘कोरोना’बाधित रूग्ण आहेत. या रूग्णांच्या मदतीसाठी जोशी धावून आले आहेत.

धनंजय मुंडेंना पीएने दिली अनोखी भेट
जाहिरात

जोशी यांनी रक्तदान करून अन्य ‘कोरोना’बाधित रूग्णांना प्लाझ्मा उपचारासाठी सहकार्य केले आहे. ‘ रक्तदान करून माझे साहेब धनंजय मुंडे यांना अनोखी भेट दिल्याचे’ जोशी यांनी ट्विट केले.

वाढदिवसालाही धनंजय मुंडे कामात

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. दिवसभर ते मंत्रालयातील कामातच व्यस्त होते.

पक्षातील नेतेमंडळी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासह राज्यभरातून त्यांच्या समर्थकांकडून मुंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

धनंजय मुंडे यांनी मात्र वाढदिवस बाजूला सारून कामकाजाला प्राधान्य दिले. मुंडे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात उपस्थित राहून विभागातील अनेक महत्त्वाच्या कामांचा निपटारा केला.

धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून पदाधिकारी व समर्थकांनी ना. मुंडे यांचा वाढदिवस सत्कारणी लावला.

परळीसह अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी