33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंचा 'कोरोना' काळात 35 लाख लोकांना मदतीचा हात

धनंजय मुंडेंचा ‘कोरोना’ काळात 35 लाख लोकांना मदतीचा हात

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लॉकडाउन (lockdown) जाहीर केला आहे. या लॉकडाउनमध्ये (Lockdown) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु या लॉकडाउनच्या (Lockdown) काळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा या हेतूने राज्य सरकारने (State Government) विशेष पॅकेज (Special package) घोषित केले आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता कहर आणि त्यात लागू निर्बंधांमुळे प्राप्त कठीण परिस्थितीत या योजनांमधील राज्यातील ३५ लाख लाभार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या विशेष पॅकेज (Special package) मधून सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील ३५ लाख लाभार्थींना एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजार प्रमाणे दोन महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यासाठी १४२८.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटलांचा मेंदू तपासण्याची गरज; अजित पवारांचा निशाणा

राज्यातल्या १३ विद्यापीठांच्या परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन होणार : उदय सामंत

India’s triple mutant Covid variant is sparking global concern. Why do we know so little about it?

कोरोना प्रतिबंधक नियमावली संदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (Chief Minister Uddhavji Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विशेष पॅकेजची (Special package) घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावर योजनेच्या लाभार्थीच्या संलग्न बँक खात्यांवर ही रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या ५ योजनांसाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबद्दल धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Chief Minister Uddhavji Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांचे आभार मानले आहेत.

याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत जारी करण्यात आला असून, यांतर्गत संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण) ३३० कोटी, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जाती) ६० कोटी, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जमाती) ४५ कोटी, श्रावणबाळ योजना (सर्वसाधारण) – ६६० कोटी, श्रावणबाळ योजना (अनु.जाती) १२० कोटी, श्रावणबाळ योजना (अनु.जमाती) – ९० कोटी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना – ११० कोटी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना – 12 कोटी आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना – १.५० कोटी असे एकूण १४२८.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, पुढील दोन तीन दिवसात तातडीने निधी संबंधित लाभार्थींच्या खात्यांवर वर्ग करण्यात यावा, असे निर्देश धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विभागाला दिले आहेत.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी