34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्र'कोरोना'चे महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे का ? : मनसेचा सवाल

‘कोरोना’चे महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे का ? : मनसेचा सवाल

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील काही ठिकाणी लॉकडाउन करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी ट्विट केले आहे की, त्यात ते म्हणाले की, ‘कोरोना’चे महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे का ?

मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारीपासून पुन्हा वाढू लागली आहे. रोजच्या रोज नवनवे आकडे समोर येत आहेत. सध्या रुग्णवाढीचा आकडा १५ हजारांच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्बंध लादण्याची भाषा सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर अनेक जिल्हा प्रशासनांनी निर्बंध लागू देखील केले आहेत. अचानक वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र शंका उपस्थित केली आहे.

 

मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक खोचक ट्वीट केले आहे. ‘महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, गुजरात कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांत करोना वाढत नाही. महाराष्ट्रात मात्र वाढतोय. करोनाचे महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारच करोनावर प्रेम आहे? की स्वतःचे अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि करोनाचा वापर होतोय?,’ असा बोचरा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

कोरोनाच्या नावाखाली लादल्या जाणाऱ्या निर्बंधांना मनसेचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. मनसेने या आधी दारूची दुकाने, रेल्वे सुरू करण्यासाठी आंदोलने ही केली आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: मास्क घालत नाहीत. इतकेच नव्हे तर मास्क न घालण्याचे बिनधास्त समर्थन करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अधिकच आक्रमक झाली आहे.

देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘करोना रुग्ण संख्या कमी होते तेव्हा आदित्य ठाकरे यांचा ‘वरळी पॅटर्न’ आणि कोरोना रुग्ण वाढले की लोक बेजबाबदार अशी टीका देशपांडे यांनी केली आहे. ‘जनतेने काम करायचीच नाहीत का? कोरोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायचे का? तुमची घाणेरडी प्रकरणे बाहेर येत आहेत म्हणून कोरोना वाढतोय का आणि एवढे कडक निर्बंध लावणार असाल तर तर जनतेला काही सवलती देणार का?,’ असा सवालही देशपांडे यांनी केला आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी