31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्र'या' तारखेपासून सुरू होणार देशांतर्गत विमानसेवा!

‘या’ तारखेपासून सुरू होणार देशांतर्गत विमानसेवा!

लय भारी टीम

नवी दिल्ली :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन 4.0 सुरु आहे. रुग्णांची संख्या 1 लाख 67 हजाराच्या पुढे गेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा २५ मे पासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

२५ मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हापासून देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी आहे. पण आता २५ मे २०२० पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, २५ मे पासून विमानतळांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.

नागरी विमान वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही गेल्या आठवड्यापासून तयार आहोत. आम्ही पुर्णपणे तयार आहोत आणि कुठल्याहीक्षणी आम्ही नोटीस काढून दशांतर्गत विमानसेवा सुरू करू शकतो. अर्थात जर आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला तर विमानाचं बुकिंग सुरू करण्यास आणि तपासणीसाठी दोन ते तीन दिवस लागतील. असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितल आहे.

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी