29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रऐन उन्हाच्या तड्याख्यात राज्यातील काही भागात, गडगडाटासह पाऊस बरसणार

ऐन उन्हाच्या तड्याख्यात राज्यातील काही भागात, गडगडाटासह पाऊस बरसणार

टीम लय भारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भात उष्णतेची लाट आहे. पण, उन्हाच्या झळा कमी होऊन राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं (IMD) अंदाज वर्तवला आहे.
(India Meteorological Department)

मार्च महिना सुरू होताच तापमानात वाढ झाली. पूर्ण मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवला. राजस्थानसह काही राज्यातील लाटसृश्य वातावरणामुळे विदर्भात देखील उष्णतेची लाट आली. अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यांतील नागरिकांना उन्हाच्या सर्वाधिक झळा बसल्या. तापमान तब्बल ४२ अंशाच्या वर पोहोचले होते. पण, आता चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. आज सायंकाळपर्यंत दोन्ही जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावासाची शक्यता वर्तविण्यात (India Meteorological Department) आली आहे.

या जिल्ह्यात पडणार पाऊस : 

येत्या ५ एप्रिलला कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापुरात (Here’s state-wise rainfall)  दमदार पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ६ एप्रिलला देखील या चारही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि गडगडाटासह पावसाची शक्यता (India Meteorological Department) आहे. कोकणातील नागरिकांना देखील उकड्यापासून दिलासा मिळणार आहे.

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान :

गेल्या तीन वर्षात केवळ अवकाळी पावसामुळे तब्बल 26 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोलापूरात रविवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे (India Meteorological Department) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. त्यामुळे दोन्ही हंगामातील तसेच फळबागांचेही नुकसान झाले होते. पीक नुकसानीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या जीवनमानावरही होणार आहे

हे सुध्दा वाचा : 

IMD weather updates: Here’s state-wise rainfall, heatwave forecast for April

आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या व्हीजनमुळे महाराष्ट्र प्रगतीकडे घोडदौड करत आहे : सुभाष देसाई

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी